Diwali Shopping
sakal
जुने नाशिक: अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. रविवारी (ता. १२) सुटीचे औचित्य साधत शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी विविध प्रकारच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी केली. बाजारपेठेतील गर्दी बघता नागरिकांचा खरेदीचा तर व्यावसायिकांना विक्रीचा आनंद मिळाल्याने दोघांसाठी रविवार खरेदी-विक्रीचा ‘सुपर रविवार’ ठरला.