Diwali Rush in Nashik
sakal
नाशिक: दिवाळीमुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शनिवारी उच्चांक गाठला. शालिमार, मेन रोड, रविवार कारंजा परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. दरम्यान, सिटीलिंक बसचा मार्ग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बदलला आहे. त्यामुळे रविवार कारंजा ते शालिमार यादरम्यान होणारी कोंडी सुटण्यास काहीअंशी मदत झाली. मात्र खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहने अन् रिक्षांमुळे काही ठिकाणी कोंडीची समस्या उद्भवत होती.