रंगबीरंगी आकाश कंदील वेधताय ग्राहकांचे लक्ष १२५ रुपयांपासुन ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध

रंगबीरंगी आकाश कंदील वेधताय ग्राहकांचे लक्ष
१२५ रुपयांपासुन ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध
Published on: 
मजकूर गरजेनुसार वापरावा -- लोगो : वेध दीपोत्सवाचे..(आजच्या दुडे ४ वरून घ्यावा) NSK26H34030 (हा फोटो ३ कॉलम घ्यावा) जळगाव : बाजारात विक्रीसाठी आलेले रंगीबेरंगी आकाश कंदील. --------------- रंगबिरंगी आकाशकंदिलांनी उजळली बाजारपेठ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३० : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या सजावटीच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत आहे. घरोघरी दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच रंगबिरंगी आकाशकंदिलांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाजारात विविध आकार, रंग आणि आकर्षक नक्षीकाम असलेले आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले असून, आपल्या घराच्या सजावटीला साजेसा कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. दिवाळीमध्ये घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अंगणात आकाशकंदील लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीच्या सजावटीमध्ये आकाशकंदिलांना विशेष महत्त्व असते. यंदा बाजारात पारंपरिक कागदी आकाशकंदिलांसह विविध रंगसंगतीतील, आकर्षक नक्षीकाम असलेले आणि आधुनिक डिझाइनचे कंदील उपलब्ध झाले आहेत. लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी अशा विविध रंगांतील कंदील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. १२५ रुपयांपासून विक्री बाजारात आकाशकंदिलांच्या किमती १२५ रुपयांपासून सुरू होत असून, आकार, रचना आणि सजावटीच्या प्रकारानुसार ५०० रुपयांपर्यंत कंदील उपलब्ध आहेत. कमी किमतीतील साध्या कंदिलांपासून ते आकर्षक नक्षीकाम असलेल्या मोठ्या कंदिलांपर्यंत विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. कोट आकाशकंदील खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत. यंदा विविध रंगांतील आणि आकर्षक डिझाइनचे कंदील उपलब्ध आहेत. १२५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत किमतीचे कंदील असल्याने ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार खरेदी करता येते. घराच्या सजावटीला साजेसे कंदील निवडण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. - किशोर सोनी, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.