Diwali Market
sakal
जुने नाशिक: दिवाळी हा केवळ उत्साहाचा सण नसून, तो अनेक गरजू व गरीब घरातील महिलांच्या जीवनात रोजगार आणि उत्साह निर्माण करणारे पर्व ठरत आहे. सध्या नाशिकच्या बाजारपेठेत अशा अनेक महिला स्वयंरोजगारावर अवलंबून असलेला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी येत असल्याने त्यांचे कष्ट सार्थकी लागत आहेत.