NMC News | आरक्षित जागेवरील भुखंड खरेदी करु नका : मनपाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation

NMC News | आरक्षित जागेवरील भुखंड खरेदी करु नका : मनपाचे आवाहन

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील विविध आरक्षित भूखंड नागरिकांची फसवणूक करून विक्री करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. महानगरपालिका (NMC) प्रशासनालाही या संदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. (Do not buy plots on reserve land Municipal corporation appeal to citizens nashik news)

शहरवासीयांनी आरक्षित जागेवरील भूखंड खरेदी करू नये असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संगमेश्वर वार्डातील ११२ ही जागा महानगरपालिकेच्या विकास योजना (दुसरी सुधारित) मध्ये ग्रीन बेल्ट, नवीन मुंबई-आग्रा रस्ता व आरक्षण क्रमांक ३८६ कंपोस्ट डेपो या आरक्षणाने बाधित आहे.

या ग्रीन बेल्ट बाधित जमिनीवर अनधिकृत तुकडे करून नागरिकांची दिशाभूल करून खरेदी विक्री व्यवहार होत आहे, अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. संबंधित जमीन आरक्षणाने बाधित असल्याने या जमिनीवर कोणतीही परवानगी देण्याचा मनपाचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पर्यायाने सदरच्या अनधिकृत वस्त्या मनपाकडून पाडण्याची कारवाई करण्यात येईल. आरक्षित जागांवर बेकायदेशीररीत्या पाडण्यात येत असलेले अनधिकृत भूखंड कोणीही नागरिकांनी खरेदी करू नयेत. मनपाच्या सूचनेनंतरही खरेदी व तसा कोणी व्यवहार केल्यास त्यास संबंधित नागरिक जबाबदार राहील असे प्रशासनाने पत्रकाद्वारे कळविले आहे.