नाशिक- शहरातील एका डॉक्टरला सायबर भामट्याने तब्बल १६ लाख ६४ हजार ९९९ रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचे बँक खाते दुसऱ्या शाखेत वर्ग करण्यासाठी ‘गुगल’वर संबंधित बँक व्यवस्थापकाचा संपर्क क्रमांक शोधला. मात्र, या क्रमांकावर संपर्क साधल्यावर भामट्याने स्वत:ला बँकेचा व्यवस्थापक म्हणून भासवत त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळविली व ओटीपीचा वापर करून रक्कम लुबाडली.