

Family Accuses Husband Of Harassment In Doctor Death Case
Esakal
Doctor Manisha Jejurkar Death Case Family Levels Serious Allegations नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉक्टर मनीषा निलेश जेजूरकर यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. ४० वर्षीय डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी जेजूरकर यांच्या पतीसह सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजूरकर यांचे पती निलेश जेजूरकर हेसुद्धा नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. मनीषा आणि निलेश यांच्यात गेल्या २ वर्षांपासून वाद होत होते आणि यातूनच मनीषा यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय.