Nashik Crime : डॉक्टरला पावणेसहा लाखाला गंडा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime fraud news

Nashik Crime : डॉक्टरला पावणेसहा लाखाला गंडा

नाशिक : दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्फरन्ससाठी फार्मा कंपनीकडून तुम्हाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगून नाशिक येथील डॉक्टरची पाच लाख ८४ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (doctor was extorted for six lakhs Nashik Crime Latest Marathi News)

हेही वाचा: पाण्यातून वाट शोधत, 'शाळेला चाललो आम्ही'; मिरगाव येथील विद्यार्थ्यांची परवड

काठे गल्ली येथील डॉ. गिरीश काळे यांना पश्‍चिम बंगाल येथील विशाल पांडे यांनी २२ ते २४ ऑगस्ट २०२२ दरम्यान संपर्क करत तुम्हाला दुबई येथे होत असलेल्या कॉन्फरन्ससाठी ग्लेनमार्क फार्मा कंपनीकडून पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या मोबदल्यात संशयित विशाल पांडे याने आपल्या बँक खात्यावर डॉक्टरांना पाच लाख ७३ हजार ४५२ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या पेटीएम नंबरवरदेखील ८ हजार ४५९ रुपये ऑनलाइन टाकण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. काळे यांनी संबंधित यांच्या खात्यावर पैसे पाठविल्यानंतर काही दिवसांनी त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कळाले.

हेही वाचा: Crime Update : बंद घरातून सोन्याचा राणीहार लंपास

Web Title: Doctor Was Extorted For Six Lakhs Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..