Crime Update : बंद घरातून सोन्याचा राणीहार लंपास

robbery news
robbery newsesakal
Updated on

जुने नाशिक : काठे गल्ली येथून ७० हजारांचा सोन्याचा हार चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात संशयीताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gold ranihar looted from closed house nashik Crime Update Latest Marathi News)

robbery news
‘50 खोके, मंत्री ओके’ भुसेंच्या विरोधात शेतकऱ्यांच्या घोषणा

मीना बधान कुटुंबीयांसह पनवेल येथे गेल्या होत्या. ३० ऑगस्टला त्या घरी परतल्या. हरितालिका असल्याने हार घेण्यासाठी गेले. ठेवलेल्या ठिकाणी हार मिळून आला नाही. त्यांनी शेजाऱ्यांसह त्यांच्याकडे कामास येणाऱ्या मोलकरणीस याबाबत विचारले. परंतु हारची माहिती मिळाली नाही.

हार ठेवण्याची जागा केवळ त्यांना आणि त्यांच्या पतींना माहिती होती. कुठलीही तोडफोड न करता चावीच्या सहाय्याने लॅच लॉक उघडून आत प्रवेश करत हार चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. १७ जुलै ते ३० ऑगस्टच्या दरम्यान अज्ञात संशयिताकडून हार चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहे.

robbery news
पाण्यातून वाट शोधत, 'शाळेला चाललो आम्ही'; मिरगाव येथील विद्यार्थ्यांची परवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yeola government clerk bribery news
Farmer’s Daughter Achieves CA Dream, Honors Late Father’s Wish
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Nashik Water Scarcity
Marathi News Esakal
www.esakal.com