Nashik : शिकवणीला जाणाऱ्या 10 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Stray Dog Attack News

Nashik : शिकवणीला जाणाऱ्या 10 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला

सिन्नर (जि.नाशिक) : भटक्या श्वानांचा (Stray Dogs) सूळसूळाट शहरात मोठ्या प्रामाणात वाढला असून आता लहान मुलांसह मोठी माणसे देखील अशा श्वानांना बिचकून राहताना दिसत आहेत. तरी अशा श्वानांचा उच्छाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. सिन्नरमधील अशाच एका 10 वर्षीय मुलावर शिकवणीसाठी जात असताना पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला (Dogs Attack) चढवल्याची घटना घडली. (Dogs attacked 10 year old boy on his way tuition at Sinnar Nashik News)

कुणाल अरविंद भांडगे (10 वर्षे) रा. विठ्ठलेश्वर मंदिराजवळ, शिंपी गल्ली हा मुलगा सोमवारी दुपारी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या बेसमेंट मधून सांगळे कॉम्प्लेक्स येथे शिकवणीसाठी जात असताना वाचनालयाच्या बेसमेंट मध्ये पाच ते सहा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून वाचनालयाच्या (Library) अभ्यासिकेतून विद्यार्थी व नागरिक मदतीला धावून गेले. त्यांनी कुणालला कुत्र्यांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. या घटनेत कुणाल याचा मांडी, खांदा व दंडाला कुत्र्यांनी चावे घेतले असून भिंतीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला देखील जखम झाली आहे.

हेही वाचा: नाशिक : पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

वाचनालयाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या खाटीक गल्लीत मांसाचे तुकडे (Meat Pieces) मिळतील या अपेक्षेने असंख्य कुत्रे घोटाळत असतात. त्यातील काही कुत्रे विसाव्याला वाचनालयाच्या बेसमेंटला येऊन बसतात. एकट्याने जाणार येणार यांच्या अंगावर ही कुत्री धावून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाल वर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार वाचनालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे.

हेही वाचा: खानावळ व्यवसायातून बेबीबाईंची परिस्थितीवर मात!

Web Title: Dogs Attacked 10 Year Old Boy On His Way Tuition At Sinnar Nashik Stray Dogs Attack News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top