रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; गृहिणींना बसतोय इंधनदरवाढीचा फटका

गॅसच्या किमती गगनभरारी घेत सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
Gas cylinder price hike
Gas cylinder price hikeesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : शासनाने रेशनवर मिळणारे रॉकेल बंद केले आहे. तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून उज्वला गॅस योजना राबवली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस आहे, पण बंद झालेले रॉकेल व गगनाला भिडलेले गॅसचे दर यामुळे चूल पेटविताना सामान्य कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातील पाणी काही आटलेले नाही.
वायू प्रदूषण व वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने सुमारे तीन वर्षांपूर्वी उज्वला गॅस योजना अमलात आणली. ही गॅस योजना मोफत असल्यामुळे घराघरांत पोहोचली, तथापि वृक्षतोडी व वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले. सामान्य गृहिणींना गॅसची सवय लागून राहिली परंतु तीन वर्षात या गॅसच्या किमती गगनभरारी घेत सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

Gas cylinder price hike
नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात महिलांची प्रसाधनगृहा अभावी कुचंबना

चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्यांना त्रास होतो तसेच महिलांच्या आरोग्याच्या समस्यांना आळा घालण्यासाठी उज्वला गॅस योजना अमलात आणली. या योजनेतून मिळणारे सिलेंडर सुरुवातीला सुमारे ३५० रुपयांना मिळत होते. पण सध्या गॅसच्या किमती इतक्या वाढल्या आहेत, की तीन वर्षात तिप्पट म्हणजे सुमारे एक हजार रुपये झाली आहे. सामान्य कुटुंबाला ही किंमत न परवडणारी असून चूल पेटविण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. रेशनवर मिळणारे रॉकेलही बंद केल्याने आता चूल कशाने पेटवायची असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.

Gas cylinder price hike
वेळीच मदत मिळाल्याने महिलेला जीवदान मिळाले

अडगळीतली स्टोव्हही बंद

सरपणासाठी वापरली जाणारी वृक्षतोड थांबली असल्यामुळे सध्या जळाऊ लाकडांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे अडगळीत पडलेले स्टोव्ह काढून महिला डिझेलचा वापर करून पेटवू लागल्या आहेत, पण डिझेलची किंमतही परवडण्यासारखी नसल्याने डोक्याला हात लावून बसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com