Natya Parishad Election: नाट्य परिषदेवर ‘रंगकर्मी’चे वर्चस्व! दामले, गोखले, शिंदेंसह 54 संचालकांची बाजी

Vijay Gokhale, Sayaji Shinde & Prashant Damle
Vijay Gokhale, Sayaji Shinde & Prashant Damleesakal

Natya Parishad Election : नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूह पॅनलने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे.

राज्यातील एकूण ६० पैकी ५४ जागा या पॅनलने जिंकल्या. प्रतिस्पर्धी ‘आपलं पॅनल’ला मात्र अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, विजय गोखले, सयाजी शिंदे यांनी ‘रंगकर्मी’चे नेतृत्व केले.

त्यांना प्रसाद कांबळी यांनी आपलं पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. दरम्यान, येत्या दोन दिवसांत नाट्य परिषदेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (Domination of Rangkarmi on Natya Parishad Election 54 directors including Damle Gokhale Shinde won nashik news)

परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक, पुण्यासह राज्यातील २० जागा बिनविरोध निवडल्या गेल्यानंतर विविध ठिकाणच्या ४० जागांसाठी रविवारी (ता. १६) मतदान झाले. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्याने चांगलीच रंगत आली होती.

रविवारी मुंबईतील दहा जागांसाठी झालेल्या मतदानात दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होऊन सोमवारी (ता. १७) सकाळी अंतिम निकाल हाती आला. यात दहापैकी ८ जागा रंगकर्मी पॅनलने जिंकल्या.

तर दोन जागांवर सुकन्या मोने व प्रसाद कांबळी निवडून आले. या निवडणुकीत रंगकर्मी पॅनलचे वर्चस्व राहिल्याने त्यांच्या पॅनलचा अध्यक्ष येत्या दोन दिवसांत निवडला जाणार आहे. यात प्रशांत दामले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

नाशिकचे तिघे बिनविरोध

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमधून रवींद्र कदम, सुनील ढगे व राजेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधातील सर्व अर्ज बाद ठरले. तर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकची निवडणूक बिनविरोध झाली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Vijay Gokhale, Sayaji Shinde & Prashant Damle
PM Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत 2 लाख महिलांना अर्थसहाय्य!

‘रंगकर्मी’चे विजयी उमेदवार (कंसात मते)

प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४), सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१), सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे (५९०) यांच्यासह राज्यातील ५४ जागांवर बाजी.

‘आपलं पॅनल’चे विजयी उमेदवार

सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७) आणि प्रसाद कांबळी (५६५), अविनाश नारकर व ऐश्‍वर्या नारकर (बोरीवली), माया चितळे (नांदेड), शैलेश गुंडे (लातूर) हे सहा सदस्य विजयी.

विभागनिहाय जागा

मुंबई : १०

नवी मुंबई : ३

नाशिक : ३

पुणे : ७

नागपूर व विदर्भ : ७

रायगड व रत्नागिरी : २

ठाणे : ३

संभाजीनगर व बीड : २

सोलापूर : ६

कोल्हापूर : ३

सांगली : ३

जळगाव, धुळे, बेळगाव, लातूर, नांदेड प्रत्येकी एक जागा आहे.

Vijay Gokhale, Sayaji Shinde & Prashant Damle
Nashik News : लोककलेतून जीवनमूल्ये जपण्याचे काम; ‘कलगीतुरा’चे लेखक दत्ता पाटील यांच्याशी संवाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com