रेल्वे स्टेशन कार्यक्रम

रेल्वे स्टेशन कार्यक्रम
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H32345 धुळे : डॉ. आंबेडकरांच्या धुळे भेटीच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकात लावलेल्या फलकासह मान्यवर. --- महामानवाचा धुळे रेल्वे प्रवासाचा फलक प्रेरणादायी : जयसिंग वाघ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जुलै १९३७ तसेच, १७ व १९ जून १९३८ रोजी चाळीसगाव- धुळे- चाळीसगाव रेल्वेने प्रवास करीत धुळे शहराला दिलेली भेट हा समस्त धुळेकरांसाठी अभिमानाचा प्रसंग आहे. धुळे रेल्वे स्टेशनवर या ऐतिहासिक घटनेची माहिती देणारा फलक (फोटो) लागल्यामुळे हा फलक युवा पिढीसह नागरिकांना प्रेरणा देत राहील, अशी भावना साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी व्यक्त केली. बुधवारी (ता. १४) श्री. वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धुळे रेल्वे स्टेशनला भेट देऊन फलकाचे दर्शन घेतले आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळे येथील एक महत्त्वाचे न्यायालयीन प्रकरण हाताळले होते. तसेच, शहरातील नामवंत स्थळांना भेट देऊन जाहीर सभांद्वारे जनतेला मार्गदर्शन व संबोधित केले होते. यासाठी ते धुळे- चाळीसगाव या रेल्वेने धुळ्यात दाखल झाले होते. महामानवाच्या या रेल्वे प्रवासाचा हा प्रसंग धुळेकरांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवासाच्या अनुषंगाने धुळे रेल्वे स्टेशनवर लावलेल्या फलकाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या काळातील धुळे शहरातील चळवळीचा प्रेरणादायी इतिहास कायम डोळ्यासमोर उभा राहील, असे वाघ म्हणाले. हा फलक भीम स्मृती संवर्धन समिती-खानदेशचे मुख्य संयोजक जयसिंग वाघ यांच्या विशेष संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रारंभी सामूहिक त्रिशरण व पंचशील झाले. शेवटी सरणत्त घेण्यात आले. याप्रसंगी एपीआय गौतम तायडे, मुकुंद सपकाळे व आनंद सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. उल्हास तासखेडकर यांनी प्रास्ताविक केले. रमेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. आनंद कोचूरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अशोक सैंदाणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश वानखेडे, नथू अहिरे, चंद्रगुप्त सुरवाडे, विशाल साळुंके, विलास भालेराव, ललित महिरे, रमेश तायडे, डॉ. चंद्रकांत भालेराव, डॉ. गौतम नन्नवरे, श्रीकांत बाविस्कर, दिनकर सोनवणे, सोमा भालेराव, शैलेंद्र नन्नवरे, डॉ. प्रेम भालेराव, राजू अप्पा भालेराव, किशोर अहिरे, राजेश सपकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ---
Marathi News Esakal
www.esakal.com