Nashik News : तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज : डॉ. अनिल काकोडकर

आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केली. मात्र जगातील पुढारलेल्या देशांच्या तुलनेत आपल्याला तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी गरज आहे.
Senior Nuclear Energy Scientist and Padma Vibhushan Prof. Dr. Prakash Vaishampayan presenting the Akshaya Award to Anil Kakodkar and Suyesha Kakodkar on Tuesday.
Senior Nuclear Energy Scientist and Padma Vibhushan Prof. Dr. Prakash Vaishampayan presenting the Akshaya Award to Anil Kakodkar and Suyesha Kakodkar on Tuesday.esakal
Updated on

Nashik News : आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केली. मात्र जगातील पुढारलेल्या देशांच्या तुलनेत आपल्याला तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी गरज आहे.

देशाला पुढे नेण्यासाठी संशोधनातून तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. (Dr Anil Kakodkar statement of Need to develop technology nashik news)

देशात विद्यार्थीकेंद्रित असे सर्वांगिण शिक्षण असायला हवे. देशातील नागरिकांची प्रगती हीच राष्ट्राची प्रगती, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट आयोजित स्वर्गीय प्र. पु. तथा बाबासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्थेतर्फे अक्षय्य पुरस्कार डॉ. काकोडकर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन अध्यक्षस्थानी होते.

सुयेशा काकोडकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सचिव हेमंत बरकले, दिलीप वैशंपायन, प्रा. रवींद्र कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते उडान विशेषांक तसेच संस्थेचे पूर्वाध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन यांच्या आठवणींच्या स्मरण गाथा पुस्तकाचे प्रकाशन झाले. मंगळवारी (ता.३०) महाकवी कालिदास कलामंदिरात पुरस्कार वितरण सोहळा झाला.

Senior Nuclear Energy Scientist and Padma Vibhushan Prof. Dr. Prakash Vaishampayan presenting the Akshaya Award to Anil Kakodkar and Suyesha Kakodkar on Tuesday.
Nashik News : चोर होता होता राहिला! पोलिसांच्या समुपदेशनाचा असाही परिणाम

डॉ. काकोडकर म्हणाले की, जे देश नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने पुढे आणतात, चांगल्या व दर्जेदार संशोधनावर भर देतात ते सरस ठरतात. आपल्या देशात तंत्रज्ञान विकासाची गती वाढवली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बाल, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सर्वांगिण श्रेष्ठ दर्जाचे मिळायला हवे. तंत्रज्ञान विकासाचे काम एकट्याचे नाही. ते संघटित होऊन करावे. हे करताना एकमेकांचे पाय ओढू नये.

असे केल्याने वैयक्तीक प्रगती साध्य होईल मात्र देशाची प्रगती होणार नाही. त्यामुळे ही मानसिकता बदलावी लागेल. नवीन शिक्षण धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला क्षमतेनुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षण मिळायला हवे. जगात सर्वोत्कृष्ट दर्जात पोचायचे असेल तर स्किल वाढवले पाहिजे. त्यादृष्टीने काम करावे लागेल. प्रा. डॉ. रवींद्र कदम यांनी प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन केले. अमृता कवीश्वर यांनी सूत्रसंचालन तर सचिव हेमंत बरकले यांनी आभार मानले.

सरकारने शिक्षक भरती करावी

देशासाठी जे काम करतात ते देशासमोर येत नाहीत. आमच्यातही क्षमता आहे हे जगाला कळले पाहिजे. मराठी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये विज्ञानाचे शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास कसा होणार? त्यामुळे सरकारने तातडीने शिक्षकभरती करून विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत.

उद्योगांनी शाळा दत्तक घेतल्यास त्याकडे केवळ उत्पन्नांचे साधन म्हणून नाही तर ज्ञानदानाचे कार्य म्हणून पाहावे, अशी भावना प्रकाश वैशंपायन यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली.

Senior Nuclear Energy Scientist and Padma Vibhushan Prof. Dr. Prakash Vaishampayan presenting the Akshaya Award to Anil Kakodkar and Suyesha Kakodkar on Tuesday.
Nashik News : 8 अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार! उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com