Nashik News : 8 अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार! उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या

अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील आठ जणांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्याने जिल्ह्याला आठ नवे अधिकारी मिळाले आहेत.
Tehsildar
Tehsildaresakal

Nashik News : अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील आठ जणांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्याने जिल्ह्याला आठ नवे अधिकारी मिळाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसांत तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या होण्याची शक्यता आहे. (8 top clerks become Naib Tehsildar nashik news)

गेल्या वर्षभरापासून अव्वल कारकून यांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागांमध्ये नायब तहसीलदार नसल्यानेही या पदोन्नतीची प्रतीक्षा होती. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र झालेले आठ नायब तहसीलदार नाशिकला मिळाले असून, यामध्ये अनेकांची मतदारसंघनिहाय नियुक्ती झाली आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून नाशिक विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील ३६ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे नाशिक महसूल विभागातील रिक्त जागांवर नायब तहसीलदार नियुक्त झाले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातीलच काही अव्वल कारकून नायब तहसीलदार झाले आहेत.

नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच त्यांची नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची पदस्थापना केली आहे. आगामी निवडणुकीचा कालावधी लक्षात घेऊन या पदोन्नती झाल्या आहेत.

Tehsildar
Nashik News: धक्कादायक! मालेगावात चक्क वीज मीटर ‘क्लोन’; मालेगाव पॉवर सप्लाय लि. कंपनी अवाक

यांना मिळाली पदोन्नती

कर्मचारी पदोन्नतीने पदस्थापना

-एस. ए. मारके.............निवासी नायब तहसीलदार, बागलाण

-एम. आर. कुलकर्णी.....निवासी नायब तहसीलदार, सुरगाणा

-एम. व्ही. गायकवाड....नायब तहसीलदार, पेठ

-एम. ए. देशमुख...........नायब तहसीलदार, नाशिक मध्य

-एच. व्ही. शिंदे..............नायब तहसीलदार, नाशिक पश्चिम

-आर. टी. पाटील...........नायब तहसीलदार, बागलाण

-रवींद्र बच्छाव..............नायब तहसीलदार (निवडणूक), बागलाण

-एस. एस. वाघमारे.........नायब तहसीलदार (निवडणूक) सुरगाणा

Tehsildar
Nashik News: पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ! पहिल्या टप्प्यात सुमारे 15 हजार शिक्षक भरती प्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com