Dr. Bharati Pawar : मोडाळेसह 3 गावांना स्वतंत्र टपाल कार्यालय

Modale (Igatpuri): While inaugurating the independent post office here, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar,
Modale (Igatpuri): While inaugurating the independent post office here, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar,esakal

इगतपुरी (जि. नाशिक) : विकासाचा वर्षानुवर्षाचा अनुशेष भरून काढणारे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोडाळे गावातील राजकारण विरहित विकास पाहून धन्यता वाटते आहे. दुर्गम भागातील टुमदार मोडाळे गावाचे बदललेले रुपडे पाहून अन्य गावांनीही शाश्वत विकासाचा मार्ग धरावा असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले. (Dr Bharati Pawar statement Independent post office for 3 villages including Modale nashik news)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Modale (Igatpuri): While inaugurating the independent post office here, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar,
Chhagan Bhujbal | कांदा उत्पादकांना गुजरातमध्ये मदत, मग महाराष्ट्रात का नाही? : छगन भुजबळ

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून आगामी काळात विकासात्मक कामांसाठी गावकऱ्यांच्या कायम सोबत असल्याचा त्यांनी शब्द दिला. मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगावासाठी स्वतंत्र मोडाळे पोस्ट कार्यालयाचे उदघाटन डॉ. पवार यांच्या हस्ते झाले.

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त विविध महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, गारगोटी संग्रहालयाचे संचालक के. सी. पांडे, टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदी उपस्थित होते.

Modale (Igatpuri): While inaugurating the independent post office here, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar,
Holi Festival : पाथर्डी गावात वीरांची मिरवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com