Bharti Pawar
Bharti PawarSakal

Nanded Hospital Deaths : नांदेड रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल : डॉ. भारती पवार

Nanded Hospital Deaths : नांदेडसह संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून, नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी आहे.

अत्यवस्थ, अपघात आणि इतर आजारांचे रुग्ण असल्याची व औषधांचा तुटवडा नसावा, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागविला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) समोर आली अन राज्यभरात खळबळ उडाली. (Dr Bharti Pawar statement Nanded patient death case notified by central government nashik news)

यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावर प्रसारमाध्यमांशी नाशिक येथे मंगळवारी (ता. ३) संवाद साधला.

त्या म्हणाल्या, की नांदेड रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, त्याबाबत खुलासा मागविला आहे. नेमके कोणते रुग्ण होते, कधी दाखल झाले होते, ही सर्व माहिती मागविण्यात आली. या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून, लवकरच सविस्तर अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

डॉ. पवार म्हणाल्या, की अनेकदा असे होते की रस्ता वाहतूक अपघात असतात, ‘इमर्जन्सी’ असते आणि रुग्ण दाखल करता-करता त्या दुर्दैवी घटना घडतात. त्याचबरोबर काही रुग्ण दाखल असतात, काही शस्त्रक्रियेसाठी असतात. शस्त्रक्रियेनंतरच्या काही कारणांमुळे घटना घडत असतात.

अजून त्याबाबत खुलासा झालेला नाही. अनेकदा ‘इमर्जन्सी पेशंट’ असतात, यात सर्पदंश किंवा अपघात असतात.

Bharti Pawar
Nanded Hospital Deaths : ....हा तर नालायक सरकारचा नाकर्तेपणा; नांदेड रुग्णालयातील घटनेवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

यात रुग्णाला दुर्दैवाने मृत्यू येतो. त्यामुळे याबाबत सविस्तर खुलासा मागविलेला आहे. सर्व प्रकारे केंद्र सरकार राज्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी तत्पर आहे. अंदाजपत्रकही त्यासाठी दिले जाते. याबाबत माहिती घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले.

राज्यात पुरेसा औषधसाठा

केंद्र सरकारकडून राज्यांना ‘बजेट’ दिले जाते, ज्यात तुम्ही औषधही घेऊ शकतात. आपल्या राज्यालाही ते दिलेले आहे. त्यामुळे औषधांच्या तुटवड्याबाबत तर काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. औषधांचा पुरवठा ‘हाफस्किन’च्या माध्यमातून सुरू आहे. त्याचबरोबर ‘प्रक्युरमेंट ऑथॉरिटी’ तीही खरेदी करणार आहे.

या व्यतिरिक्त जिल्ह्यातही ‘डीपीडीसी’कडे निधी असतो, की ज्यात ‘इमर्जन्सी’मध्ये निधी वापरू शकतात. स्थानिक ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयही असते. तेही निर्णय घेतात, त्यामुळे या घटनेत औषधांचा तुटवडा असेल, असे प्रथमदर्शनी दिसत नाही. घटनेबाबत सविस्तर खुलासा आल्यावर नेमका प्रकार आणि मृत्यूचे कारण याबाबत सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

Bharti Pawar
Nanded Hospital Deaths : खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा! 'डीन'ला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com