Vijaykumar Gavit News : दुग्ध विकास उपक्रमातून आदिवासींचे सक्षमीकरण : डॉ. गावित

Dr Gavit statement about Empowerment of tribals through dairy development activities nashik news
Dr Gavit statement about Empowerment of tribals through dairy development activities nashik newsesakal

Nashik News : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायित्व गटाचे गठण करून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रायोगिक तत्त्वावर काही तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात असून, तेथे यशस्वी झाल्यास राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागात आदिवासी बांधव आर्थिक सक्षम होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Dr Gavit statement about Empowerment of tribals through dairy development activities nashik news)

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक आणि सुमूल (सुरत डिस्ट्रिक्ट मिल्क को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लि.) यांच्यातर्फे आदिवासींसाठी संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत गुरुवारी (ता.१४) डॉ. गावित यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, ‘सुमूल’चे व्यवस्थापकीय संचालक अरुण पुरोहित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, तुषार माळी, आदिवासी आयुक्त विनिता सोनवणे, संतोष ठुबे, आदिवासी मोर्चाचे एन. डी. गावित यांसह लाभार्थी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की दुग्धविकास प्रकल्प हा पथदर्शी असून, पहिल्या टप्प्यात गुजरात सीमावर्ती भागात राबविण्यात येत आहे. नाशिक (सुरगाणा), नंदुरबार, धुळे (साक्री) या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr Gavit statement about Empowerment of tribals through dairy development activities nashik news
PESA Teacher Recruitment : पेसा शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर; 16 व 18 ला कागदपत्रांची पडताळणी

पुढच्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू व तलासरी आदींसह संपूर्ण आदिवासी भागात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत खरेदी केलेल्या जनावरांच्या विक्रीवर बंदी असेल.

सुमूल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे या उपक्रमाला सहकार्य असेल. आदिवासीतील लोकांचे उत्पन्न वाढीला यातून हातभार लागणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक पुरोहित यांनी सांगितले. या पथदर्शी उपक्रमातून १२ हजार ५०० कुटुंबांत क्रांती घडणार असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

शबरी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. दूध संघ दुधाची तपासणी करून घेणार असल्याने यात कोणाचीही पिळवणूक होणार नसल्याचे संचालक बनसोड यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. सुरगाणा तालुक्यातील लाभार्थ्यांचा मंत्री गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामंडळाचे व्यवस्थापक बाबासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

Dr Gavit statement about Empowerment of tribals through dairy development activities nashik news
Ashram School Teacher Exam : शिक्षक क्षमता चाचणी परीक्षेवर ‘सीटू’ संघटनेचा बहिष्कार कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com