Mission Bhagirath Prayas : जिल्ह्यात मिशन भगीरथ प्रयासतंर्गत ३१ कामे पूर्ण : डॉ. गुंडे

Zilla Parishad nashik
Zilla Parishad nashikesakal

Mission Bhagirath Prayas : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या महत्वकांक्षी असलेल्या मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत सुरू असलेल्या कामांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागल्यानंतर देखील जिल्ह्यात ३१ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.

मंजूर झालेल्या २६१ कामांपैकी १३७ कामांना सुरवात झाली आहे. सुरू झालेली कामे पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिल्या. (Dr gund statement 31 works completed under Mission Bhagirath Prayas in district nashik news)

जिल्ह्यातील दरवर्षींचा दुष्काळ पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे दुष्काळी गावातील चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत, ‘मिशन भागीरथी प्रयास’ हाती घेतले आहे.

या मिशन अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची सुमारे ६२५ कामे हाती घेतली आहेत. या कामांची रक्कम जवळपास १०० कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांमधील १५० गावांमध्ये पाच ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधणे, दुरुस्त करणे या कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प करण्यात आला होता.

मिशन अंतर्गत कामे सुरू झाल्यानंतर १५ दिवसात पहिले काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल महिनाभर या कामांना गटविकास अधिकारी यांच्या बहिष्काराचा फटका बसला होता.

नरेगा अंतर्गत कामांमध्ये ग्रामपंचायतस्तरावर चुका झाल्यास त्यास गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरले जाणार असल्याचा शासन निर्णय झाला होता. या निर्णयास विरोध म्हणून महिनाभर गटविकास अधिकारी यांना या कामांवर बहिष्कास्त्र उगारले होते. १२ मे रोजी यावर तोडगा निघाल्यानंतर या कामांना पुन्हा प्रारंभ झाला.

जिल्ह्यात मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत ६२५ कामे आराखड्यात घेण्यात आली असून यातील ३५५ कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील २६१ कामांना मंजुरी मिळाली आहे. १३७ कामांना प्रत्यक्षात सुरवात होऊन ३१ कामे आतापर्यंत पूर्ण देखील झाली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Zilla Parishad nashik
Nashik News: रिंगरोडसाठी राज्य शासनाने माहिती मागविली; सिंहस्थाच्या कामाला वेग

या कामांचा डॉ. गुंडे यांनी मंगळवारी (ता.३०) व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारा आढावा घेतला. यात अनेक कामांचे कुशल -अकुशल मोजमाप ऑनलाइन अपलोड करण्यात आले नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे पूर्ण झालेली कामे ही अपूर्ण दिसत असल्याने मोजमाप अपलोड करावे. ऑनलाइन प्रक्रीया जलद गतीने राबविल्यास कामे वेळात पूर्ण होतील, असे डॉ. गुंडे यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

तालुका आराखड्यात घेण्यात आलेली कामे प्राप्त प्रस्ताव मंजूर झालेली कामे सुरू झालेली कामे पूर्ण झालेली कामे

बागलाण ४६ ४४ ४४ १७ ५

चांदवड ३७ १० १० ७ ३

देवळा ३२ ३२ २८ ११ ५

दिंडोरी ६४ २३ २३ ८ १

इगतपुरी १२ ८ ४ ३ २

कळवण ६० ६० ११ ११ ०

मालेगाव ६४ ५१ ५१ २३ ४

नांदगाव ५३ ५३ ३३ १९ ५

नाशिक १ १ १ १ ०

निफाड ७ २ २ २ ०

पेठ ३५ २० ६ ४ २

सिन्नर १५ १० ७ ७ ०

सुरगाणा ११३ ११ ११ ७ १

त्र्यंबकेश्वर ७१ १५ १५ ७ ३

येवला १५ १५ १५ १० ०

Zilla Parishad nashik
Nashik : नियोजन कोलमडल्याने व्यवसायावर परिणाम; प्लॅस्टिक कापड विक्रेत्यांना पहिल्या पावसाची प्रतीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com