Latest Marathi News | MUHSच्या कुलसचिव पदी डॉ. राजेंद्र बंगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUHS

MUHSच्या कुलसचिव पदी डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ. राजेंद्र शिवाजी बंगाळ (एम.डी. न्यायवैद्यकशास्त्र) रुजू झाले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव पदाकरीता निवड झाल्याबद्दल डॉ. बंगाळ यांचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ. राजेंद्र बंगाळ यापूर्वी 2021 पासून पुण्याचे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज येथे न्यायवैद्यकशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सन 1990 मध्ये नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. तसेच सन 1994 मध्ये न्यायवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले आहे. तसेच सन 1996 मध्ये नागपूर येथून एल.एल.बी. व नवी दिल्ली एन.बी.ई. येथून डी.एन.बी. (लिगल मेडिसिन) पदवी शिक्षण घेतले आहे तसेच सन 1997 मध्ये सी-डॅक मधून इन्फोरमेशन टेक्नोलॉजी विषयात पदविका शिक्षणक्रम पूर्ण केला आहे. सन 1999 पासून विविध संस्थाचे वैद्यकीय सल्लागार आहेत.

हेही वाचा: वाचनवेग वाढवण्यासाठी काय कराल ?

पुण्याचे ससून रुग्णालय, मुबंईचे ग्रॅंट मेडिकल कॉलेज व लोणीचे रुरल मेडिकल कॉलेज येथे अटॉप्सी सर्जन म्हणून कार्य केले आहे. मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये सहा वर्ष सहयोगी प्राध्यापक पदाचा तसेच पुण्याचे काशिबाई नवले मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक व विभागप्रमुख पदाचा तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीचा अनुभव त्यांना आहे. कोची येथील एम.ओ.एस.सी. येथील प्राध्यापक पदाचा अनुभव त्यांना अनुभव आहे. सन 2010 मध्ये आरोग्य विद्यापीठाचे अभ्यासमंडळाचे ते सदस्य होते. त्यांचे विविध शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय सेमिनार व कार्यशाळामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. न्यायवैद्यकशास्त्र विषयातील त्यांच्या अभ्यासाचा भाग तीन शैक्षणिक पाठयक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांना तीस वर्षापेक्षा अधिक कालावधीचा शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे.

हेही वाचा: काय आहे शरद पवार पॅटर्न? जो केजरीवाल, सिसोदियादेखील आज वापरतात

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी अभिनंदन केले आहे.

Web Title: Dr Rajendra Bangal Appoint Registrar Of Muhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikMUHS exam