डॉ. सुवर्णा वाजे प्रकरण : पतीला 7 दिवस कोठडी, साथीदारांचा शोध सुरु

dr suvarna waje case court sentenced sandeep waje  to 7 days in police custody searching for accomplices
dr suvarna waje case court sentenced sandeep waje to 7 days in police custody searching for accomplices
Updated on

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्या हत्येप्रकरणात वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित पती संदीप वाजे याला शुक्रवारी अटक करून इगतपुरी न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाची मागणी व तपासाचा भाग पाहत न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात संदीप वाजेला मदत करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. यात एका संशयिताचा तपास पोलिसांना लागला असून त्याचा मागावर पथक गेले आहे. अजून काहींजणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान शनिवारी (ता.५) दिवसभरात संदीप वाजे याला घटनास्थळी नेऊन त्याच्याकडून क्राईम सीन पूर्ण करून घेतला जाणार आहे.

सिडकोतील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे (वय ३४, रा. कर्मयोगी नगर, गोविंद नगर, नाशिक) यांचा कौटुंबिक वादातून पती संदीप याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ जानेवारीला जळालेल्या कारमध्ये महिलेचा सांगाडा आढळून आला होता. सांगाड्याची ओळख पटवणे शक्य नसल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील व तपासी पथकाने डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. अहवाल येण्याअगोदर डॉ. वाजे यांच्या पतीसह इतर नातलगांकडे चौकशी केली. डीएनए चाचणीत आढळलेला मृतदेह डॉ. वाजे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संदीप वाजे यास प्राथमिक तपासानंतर अटक केली. वाजे हा कन्स्ट्रक्शन ठेकेदार असून त्याचे व सुवर्णा यांचे कौटुंबिक कलह होते. सात ते आठ वर्षापासून त्यांच्यात वाद असल्याने दोनदा फारकतीपर्यंत प्रकरण गेले होते.

dr suvarna waje case court sentenced sandeep waje  to 7 days in police custody searching for accomplices
नाशिक - विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; 20 हून अधिक जखमी

मदतगारांचा शोध

न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी वाजेच्या या क्रूर कृत्यात मदत करणारे व त्याने खून कसा केला, कुणाची मदत घेतली, नियोजन कसे केले, ज्वलनशील पदार्थ कसे मिळवले याचा तपास करण्यासाठी १५ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. वाजे खून प्रकरणात वाजेसह इतर तीन ते चार संशयितांचा सहभाग आढळून आला आहे. तसेच संदीप वाजे याचे सीडीआर रिपोर्टमध्येही त्याचे लोकेशन घटनास्थळापर्यंत दिसून आले आहे. खून करताना त्याने साथीदार संशयितांना काही सुपारी वा काही आमिष दाखविले याचा तपास केला जाणार आहे.

dr suvarna waje case court sentenced sandeep waje  to 7 days in police custody searching for accomplices
धीरज,आम्हाला नाही तुझी गरज; घाटेंच्या पोस्टरबाजीला जशास तसे उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com