धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H33873 (डॉ. तुषार निकुंभे)
---
डॉ. तुषार निकुंभे ‘एमएस’ उत्तीर्ण
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : शहरातील साक्रीरोड परिसरातील रहिवासी डॉ. तुषार बळवंत निकुंभे यांनी नुकतीच एमएस (ऑर्थोपेडीक) ही उच्च पदवी वसंतराव मेडिकल कॉलेज, नाशिक येथून उत्तम गुणांनी संपादन केली. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेचा नुकताच निकाल लागला. या परीक्षेत डॉ. निकुंभे यांनी हे यश मिळविले. डॉ. निकुंभे यांनी केईएम हॉस्पीटल, मुंबई येथून चांगल्या गुणांनी एमबीबीएस पूर्ण केले. डॉ. निकुंभे हे धुळे शहरातील जे. आर. सिटी हायस्कूलचे निवृत्त उपमुख्याध्यापक बळवंत निकुंभे व मोघण येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका वंदना निकुंभे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल धुळे एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, विद्यमान अध्यक्ष युवराज करनकाळ, मानद सचिव संतोष अग्रवाल, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, निवृत्त प्राचार्य पंडित निकुंभे, निवृत्त कार्यकारी अभियंता भाईदास निकुंभ, डॉ. जितेंद्र निकुंभ, डॉ. सौरभ निकुंभ, न्यू सिटी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक विलास हलकारे, मुख्याध्यापक श्री. नागरे, डॉ. हिराजी पवार, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पवार, डॉ. प्रांजल पाटील, डॉ. महाले, प्रा. विनोद जैन, बी. डी. पाटील, राजेंद्र गुलाले, श्री. वाडेकर, नंदकिशोर शेवाळे, डॉ. तुषार निकुंभे आदींनी कौतुक केले.
---