
Nashik News : सगेसोयरे, सरसकट शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्यावतीने गुरुवारी (ता.१) शहरातील लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर धडक मारत निवेदन देण्यात आली.
परिषदेच्यावतीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (draft government gazette should be canceled immediately by India Mahatma Phule Samata Parishad nashik news)
मसुदा तत्काळ रद्द करा अन्यथा ओबीसी, भटके, विमुक्तांचे मतदान विसरा असा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने मराठा आरक्षण संदर्भात ‘सगेसोयरे’ या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ‘ब’ हा मसूदा २६ जानेवारीला काढला.
या मसुद्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. मराठा समाजाला स्वतंत्र वेगळे आरक्षण देण्यास ओबीसी समाजाची हरकत नाही.
जर ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला होता. तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याचाच भाग म्हणून गुरुवारी समता परिषदेच्यावतीने खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे , जिल्हाधिकारी यांना समता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आली.
लोकप्रतिनिधी हा सगळ्याच नागरिकांचा प्रतिनिधी असतो, आमदार हा कुठला एका जातीचा किंवा धर्माचा नसतो असे असताना जेव्हा ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्यायकारक निर्णय विधिमंडळात होत आहे. हा निर्णय रद्द करावा, झुंडशाहीच्या दबावाला बळी पडू नये अशी मागणी समता परिषदेच्या शहराध्यक्ष कविता कर्डक यांनी केली.
याप्रसंगी समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, भालचंद्र भुजबळ, आशाताई भंदुरे, नाना पवार, सचिन जगताप, अजय बागुल, भरत जाधव, अमोल नाईक, शंकर मोकळ, अरुण थोरात, पोपटराव जेजुरकर, श्रीराम मंडळ, अरुण थोरात, गजू घोडके , ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, अविनाश माळी, मीनाक्षी काकळीज, रूपाली पठारे, दिलीप माळी.
अर्जुन भडके, अंजू थामीन, सुनील देवरे, कृष्णा काळे, सुनील ढगे, पप्पू शिंदे, संतोष भुजबळ, प्रणाली पेंढारकर, बाळासाहेब तिडके, संतोष तिडके, पप्पू तिडके, दत्तात्रेय माळी, मोतीराम काठे, प्रल्हाद माळी, गौतम तिडके, मोहन तांबे, नाना शिंदे, शिवाजी तिडके, सुभाष तिडके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.