Water Crisis: आटलेले जलस्रोत अन्‌ रब्बीच्या नियोजनाचे आव्हान! नांदगाव तालुक्यात दुष्काळाच्या संकटाची चाहूल

Water reservoir in Manikpunj dam in taluka. The second photo shows the receding water level of dead stock in Nagyasakya Dam.
Water reservoir in Manikpunj dam in taluka. The second photo shows the receding water level of dead stock in Nagyasakya Dam.esakal

Water Crisis : तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. एकीकडे तालुक्यातील वाड्या वस्तींवर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात असताना त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तर दुसरीकडे माणिकपुंज धरणात अवघे पस्तीस टक्के एवढा जलसाठा परतीच्या पावसामुळे उपलब्ध झाला असला तरी येत्या मे जून पर्यंत त्यातील पाणी जपायचे कसे? असा कळीचा मुद्दा देखील उभा राहिला आहे.

त्यामुळे आटलेले जलस्रोत, अन्‌ रब्बीच्या नियोजनाचे आव्हान ही मोठी समस्या यंत्रणेसमोर आहे. (Dried up water resources and challenge of Rabi season planning Drought crisis in Nandgaon taluka nashik)

नांदगाव तालुक्यात माणिकपुंज वगळता अन्य धरणे तलाव व नालाबंडींग अद्यापही कोरडेठाक आहेत. त्यामुळे सगळी मदार माणिकपुंज, चांदेश्वरी, गळमोडी येथील पाण्यावर निर्भर आहे. माणिकपुंज धरणात सध्या २७७ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे.

तर नाग्यासाक्या धरणात अवघे ९१ दशलक्ष घनफूट एवढाच जलसाठा शिल्लक असून तो देखील एकूण मृत साठ्याच्या निम्मे एवढाच आहे. लोहशिंगवे जलाशयात पाच, रणखेड्याला अडीच, भालुरला पाच दशलक्ष घनफूट एवढाच अल्पसा तोही मृतसाठा शिल्लक आहे.

मांडवडवाडी व पोखरीचे जांभुळबेट हे कोरडेठाक आहेत. एकूणच तालुक्यातील जलस्रोत आजमितीला असून नसल्यासारखे आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यातील रब्बी हंगामाला कसे सामोरे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावीत आहे.

मुळातच माणिकपुंज असो की नाग्यासाक्या यांच्या कालव्यांचे सक्षमीकरण न झाल्याने अगोदरच सिंचनाचा ताळमेळ कधीच बसला नसताना अशा संकटकाळात रब्बीचे नियोजन आव्हानात्मक असणार आहे.

अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामावर परिणाम

माणिकपुंज, नाग्यासाक्या चांदेश्वरी, गुळमोडी लोहशिंगवे, भालुर, मांडवडवाडी, रणखेडा, पोखरीअशी सर्व धरणे पावसाने भरली असती तर तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचन योग्य असे होऊ शकले असते.

Water reservoir in Manikpunj dam in taluka. The second photo shows the receding water level of dead stock in Nagyasakya Dam.
Nashik Water Crisis: इगतपुरीत 12 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद! संतप्त नागरिकांचे नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन

मात्र अत्यल्प पावसाने सध्याच्या रब्बी हंगामावरच मोठा परिणाम केला आहे. प्रशासकीय यंत्रणा अजूनही कागदावरच्या आकडेवारीत मग्न असल्याने नोव्हेंबर ते जून दरम्यान उभ्या ठाकलेल्या दुष्काळाच्या तीव्रतेचा तालुका स्तरीय प्रशासकीय यंत्रणा कसा व कशा पद्धतीने मुकाबला करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एकूणच हे सर्व शासकीय कामकाजाचा भाग बनत असल्याने दुष्काळासारख्या संकटात यापूर्वीच्या यंत्रणेतील घटकांनी कुठल्या स्वरूपाच्या उपाय योजना केल्यात हे जाणून घेतले तरी विद्यमान यंत्रणेला त्यांचा अनुभव कामाला येऊ शकतो.

दररोज ३५ टँकरच्या माध्यामातून पाणी पुरवठा

सध्या तालुक्यातील वाखारी, शास्त्रीनगर, बोयेगाव, खादगाव, धोटाणे खुर्द, लक्ष्मीनगर, भार्डी, हिसवळ खुर्द, नागापूर, पांझणदेव, माळेगाव(क), बेजगाव, वंजारवाडी, सटाणे, मल्हारवाडी, कऱ्ही, वडाळी बुद्रूक, पानेवाडी, मोहेगाव, धनेर, बाणगाव खुर्द, अस्तगाव, मांडवड, एकवाई, मोरझर, बाणगाव बुद्रूक,

जळगाव खुर्द, अनकवाडे, भौरी, हिसवळ बुद्रूक, दहेगाव, सोयगाव, खिर्डी, भालूर, टाकळी बुद्रूक, साकोरा आदी ३४ गावे व त्यातील एकूण १६० हून अधिकच्या वाड्या वस्त्यांना ३५ टँकरच्या माध्यमातून नव्वद ९० फेऱ्या सुरु आहेत.

नजीकच्या काळात त्यात अजून वाढ होईल. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा नोव्हेंबर पर्यंत पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

Water reservoir in Manikpunj dam in taluka. The second photo shows the receding water level of dead stock in Nagyasakya Dam.
Soybean Rates Fall: दराअभावी पिवळे सोने काळवंडले! सोयाबीनच्या दरात 4 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com