Nashik Water Crisis: इगतपुरीत 12 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद! संतप्त नागरिकांचे नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन

While protesting at the municipal council office, D. no Outspoken and angry women
While protesting at the municipal council office, D. no Outspoken and angry womenesakal

इगतपुरी शहर : पावसाच्या माहेरघरीच पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील शिवाजीनगर, पंढरपूरवाडी, सह्याद्रीनगरमध्ये गेल्या १२ दिवसांपासून भावली पाणीयोजनेची नवीन पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा झालेला नाही. (Water supply stopped in Igatpuri for 12 days Protest by angry citizens in municipal council nashik)

नगरपरिषद प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांवर पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे.

मंगळवारी (ता. ३) संतापलेल्या रहिवाशांनी आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली नरपरिषद कार्यालय गाठत कर्मचाऱ्यांना बाहेर काढत नगरपालिका बंद केली.

नगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर मांडला ठिय्या आंदोलन केले. पाणी येत नाही, तोपर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.

While protesting at the municipal council office, D. no Outspoken and angry women
Jarange Patil Sabha: जरांगे पाटलांची 9 ला येवल्यात विराट सभा! तयारी पूर्णत्वाकडे; लाखो मराठा समाज जमणार

परिस्थिती लक्षात घेता पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी मध्यस्थी करून मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत चारपर्यंत पाणी येईल, असे सांगत आंदोलकांची समजूत काढत ठिय्या मागे घेण्याचे आवाहन केले.

आंदोलकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन स्थगीत केले. यामुळे नगरपरिषद परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

पाणी आले नाही, तर बुधवारी परत नगरपरिषद कार्यालय बंद करण्याचा इशारा देत आंदोलनकर्ते माघारी फिरले. मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

While protesting at the municipal council office, D. no Outspoken and angry women
Nashik Onion Auction: लासलगावला कांद्याला 2050 रुपये सरासरी भाव! बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com