ZP Water Crisis : जिल्हा परिषद मुख्यालयात पिण्याच्या पाण्याची वणवण!

water crisis
water crisisesakal

ZP Water Crisis : उन्हाचा पार वाढत असताना ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिलांचे विदारक चित्र दिसत असताना जिल्हा परिषदेतील मुख्यालयात देखील कामासाठी येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

मुख्यालयातील इमारतीत पिण्याच्या पाण्याची कोठेही व्यवस्था नसल्याने पाणी मिळत नसल्याचे, हॉटेलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांसह येणाऱ्यांना आपली तहान भागवावी लागते.

एकीकडे मुख्यालय इमारतींच्या डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Drinking water crisis in Zilla Parishad headquarters nashik news)

जिल्ह्याच्या विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद. संपूर्ण जिल्हाभरातील पिण्याचे पाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून होत असते. मात्र, जिल्हा परिषदेतील मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागत यांचे हाल होत आहेत.

जिल्हा परिषदेत अधिकारी कर्मचारी वगळता दररोज येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारण पाचशे ते सहाशे सर्वसामान्य नागरिकांचा काही ना काही कामानिमित्त राबता असतो. येथे आल्यानंतर नागरिक जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याकारणाने तहानेने व्याकूळ होत आहे.

तहान लागल्यानंतर अभ्यागतांना थेट समोरील हॉटेल गाठावे लागते. येथे विकत पाण्याची बाटली घेऊन आपली तहान भागवावी लागते. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली. यावर लक्ष देखील वेधले होते. मात्र, प्रशासन नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात दंग आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water crisis
Onion Subsidy : बळीराजाला अजूनही कांदा अनुदानाची प्रतिक्षा! अर्जांतील त्रुटींमुळे छाननीला लागतोय वेळ

मुख्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसताना येथील इमारतीला लिफ्ट बसविण्याचा घाट प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करण्याचा आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारात एकही पाण्याची टाकी, जलकुंभ किंवा फिल्टर अशी काहीच व्यवस्था नाही. याबाबत जिल्हा परिषद प्रशासन काही कार्यवाही करणार की आहे त्याच परिस्थितीत उन्हाळा घालवणार याकडे लक्ष लागले आहे.

फिल्टरही बंद दाराआड

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी दालनात पिण्याच्या पाण्यासाठी माजी सभापती संजय बनकर यांनी स्वखर्चातून फिल्डर बसविले आहे. मात्र, प्रशासकीय राजवट असल्याकारणाने पदाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लावण्यात आले आहे.

या ठिकाणी असलेले फिल्टर देखील बंद दाराआड गेले आहे. सदर फिल्टरचा वापर करण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होऊ लागली आहे.

water crisis
Historical Inscription: लाखलगावाच्या घाटावर अठराव्या शतकातील ‘शिलालेख'! सरदार अप्पाजी वैद्य यांचा इतिहास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com