drinking water supply
sakal
नाशिक: जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाबाबत हात झटकणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अखेर नमते घेतले आहे. प्रशासनाने शुक्रवारी (ता. १०) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने नव्याने पत्र तयार केले आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व पाणी वापर संस्थांनी पुढील वर्षासाठी आवश्यक पाण्याची मागणी नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘सकाळ’ने याबाबत ‘महसूलने झटकली पाणी आरक्षणाची जबाबदारी’ या मथळ्याचे वृत्त शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.