esakal | जिल्ह्यात टँकरचे अर्धशतक! ५२ टँकरमधून गावांना पिण्याचे पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

water tanker

दुष्काळी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी गावे आणि वाड्यांवर शासकीय व खासगी टँकरच्या माध्यामातून पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात टँकरचे अर्धशतक! ५२ टँकरमधून गावांना पिण्याचे पाणी

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त (Drought) भागात पाणीटंचाई आता अधिक तीव्र होत असून, जिल्ह्यात टँकरने अर्धशतक पूर्ण केले आहे. ५२ टँकरच्या माध्यामातून ७० गावे आणि ४२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. (Drinking water supply to villages from 52 water tankers in nashik district)

महिनाअखेरीस टँकरच्या संख्येत वाढ

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यात कोरोना (Coronavirus) संकटासह दुष्काळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र होत असून, टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. दुष्काळी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी गावे आणि वाड्यांवर शासकीय व खासगी टँकरच्या माध्यामातून पाणीपुरवठा केला जात आहे.

मे महिन्याच्या सुरवातीपासून ही टंचाई अधिक तीव्र होत असून, महिनाअखेरीस टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील टँकरने अर्धशतक गाठले आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर आणि येवला या तालुक्यांतील ७० गावे आणि ४७ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सात शासकीय व ४५ खासगी, अशा ५२ टँकरच्या माध्यमातून १२७ फेऱ्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यात येवला तालुक्यात सर्वाधिक १८ टँकर सुरू आहेत.

हेही वाचा: कोरोना रुग्णांना नातेवाइकांनी पुरविले डबे, तरी पाऊण कोटींचे बिल

तालुक्यातील टँकरची स्थिती

तालुका टँकर (संख्या)

चांदवड - ६

देवळा - २

इगतपुरी - ३

मालेगाव - ३

नांदगाव - १

पेठ - ७

सुरगाणा - ५

त्र्यंबकेश्‍वर - २

येवला - १८

(Drinking water supply to villages from 52 water tankers in nashik district)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का