Cleanliness Drive : Smart City Company, NMC, नाशिक ब्लॉगर्स ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम

Smart City Company NMC Nashik Bloggers Group
Smart City Company NMC Nashik Bloggers Groupesakal

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक स्मार्ट सिटी कंपनी नाशिक महानगरपालिका आणि नाशिक ब्लॉगर्स ग्रुप यांच्यातर्फे रविवारी (ता.१३)सकाळी शहीद चित्ते पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी २५० किलो कचरा संकलन करण्यात आला आहे. यात प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. (drive by Smart City Company NMC Nashik on shahid chitte bridge Bloggers Group Nashik news)

शहरातील काही नागरिक हे रात्री उशिरा किंवा मॉर्निंग वॉकला निघताना आपल्या घरातील कचरा प्लास्टिक पिशवीत बांधून कुठेही रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी अनेक मद्यपी अंधाराचा फायदा घेऊन मद्य प्राशन करून तिथेच बाटल्या आणि ग्लास फेकून निघून जातात. या सर्व फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत डासांचे प्रमाण वाढले असून, आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास ९ नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण ४५ दिवसाच्या कालावधीत होणार आहे . या सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी https://eol2022.org/citizenfeedback या वेबसाइटला भेट देऊन जवळपास १७ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.

Smart City Company NMC Nashik Bloggers Group
Goa Ironman Competition : गोव्याच्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचे 11 खेळाडू चमकले!

नाशिक शहरासाठी ८०२७७६ हा स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) कोड देण्यात आलेला आहे. या सिटीझन फिडबॅकमध्ये शहरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, रोजगार संधी, उद्यान व मैदान, पादचारी मार्ग, सुरक्षितता अशा देत असलेल्या सुविधा पुरेशा आहे किंवा कसे, नागरिकांचे सुविधांप्रती मत याद्वारे भविष्यातील योजना आणि कार्यपद्धती ठरविण्यास मदत होणार आहे.

२०१८ ला नाशिक शहराला २१ तर २०२० ला ३८ क्रमांक मिळाला होता. तर यंदा नाशिक शहराला गुणांकन सुधारावयाचे असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. याप्रसंगी 'इज ऑफ लिव्हिंग' इंडेक्स सर्वेक्षण मोहीम २०२२ बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वच्छता दूत चंद्रशेखर पाटील, स्मार्ट सिटीचे नीलेश बर्डे, नाशिक ब्लॉगर्सचे रोहित चौधरी, जुही पाटील, मोहित पाटील, रोशन केदार, मोहित पाटील, आर्या बुवा, समृद्धी दाणी, प्रथमेश बोरसे, स्वामिनी गवळी, सुप्रिया नरवडे आदींनी सहभाग घेतला होता.

Smart City Company NMC Nashik Bloggers Group
Makar Sankranti 2023 : संक्रांतीची चाहूल अन् तरुणाईमध्ये पतंग उडविण्याचा फिवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com