Makar Sankranti 2023 : संक्रांतीची चाहूल अन् तरुणाईमध्ये पतंग उडविण्याचा फिवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 : संक्रांतीची चाहूल अन् तरुणाईमध्ये पतंग उडविण्याचा फिवर!

जुने नाशिक : मकर संक्रांत दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. पतंग प्रेमींना संक्रांतीची चाहूल लागताच आतापासूनच पतंगीचे दुकाने सजली आहेत. पंतगींची नोव्हेंबर महिन्यातच ३० ते ४० टक्के मागणी होत आहे. संक्रांतीच्या दीड महिन्याआधीच पंतग उडविण्याचा फिवर तरुणांमध्ये आला आहे. (Makar Sankranti 2023 kite selling incraeased flying fever in youth Nashik News)

पतंग प्रेमींना संक्रांतीच्या दीड ते दोन महिने अगोदरपासूनच संक्रांतीची चाहूल लागत असते. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्व पतंग उडवण्याचा आनंद घेतात. तसेच, यंदा सर्वच सण उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहे. संक्रांती म्हटली की पतंगबाजी आलीच. चिमुकल्यांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांकडून पतंगबाजी करण्याचा आनंद सुट्टीच्या दिवशी घेतला जात आहे.

त्यामुळे पतंग आणि मांजा यास मागणी वाढली आहे. संक्रांतीस दीड ते दोन महिने अवकाश असला तरी सध्या तीस ते चाळीस टक्के पतंगीची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने पतंगीचे दुकानेही सजले असून रंगबिरंगी विविध प्रकार, कागदाच्या पतंगी बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या आहे. सध्या हवी तशी विविधता किंवा विशेष प्रकारच्या पतंगी बाजारात अद्याप दाखल झाल्या नाही. परंतु, दाखल झालेल्या पतंगी मात्र विक्री होत असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात विविध प्रकारच्या पतंगी बाजारात दाखल होण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी दर्शवली. सहा इंच ते चार फूट पतंग विक्रीस आहे. दोन ते १५ रुपयांपर्यंत किंमत असलेल्या पतंगींचा सर्वाधिक खप आहे.

हेही वाचा: PM WANI Yojana : चला! रेशन दुकानाजवळ अन् मिळवा अल्प रकमेत Internet सुविधा!

पतंगीचे प्रकार

रामपुरी, हॅप्पी न्यू इयर २०२३, आय लव माय इंडिया, फ्री फायर, प्लॅनेट रायडर, मटका, मार्बल, कापडी, प्रिंटेड मटका, येवला धोबी प्रिंटेड, पारंपारिक कागदी, स्पायडरमॅन, कार्टून

कॉटन मांजा प्रकार

मांजा (पांडा) दर (रील)

चार तारी १००

सहा तारी १५०

नऊ तारी १५०

बारा तारी २००

सोळा तारी २५०

येथून येतात पतंगी

उत्तर प्रदेश येथील रामपूर, बरेली, कानपूर तसेच गुजरात, सुरत विविध प्रकारच्या पतंग बाजारात विक्रीस येत असतात. सुरत पेक्षा रामपूर आणि बरेली येथील पतंगींना अधिक मागणी असते.

"नोव्हेंबर महिन्यापासूनच संक्रांतीची चाहूल लागते. त्यानिमित्ताने यंदा आतापासूनच तीस ते चाळीस टक्के पतंगीची मागणी होत आहे. महागाईमुळे दरांमध्ये ४० वाढ झाली आहे. पुढील महिन्यात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे."

-अमजद शेख, विक्रेता

हेही वाचा: Goa Ironman Competition : गोव्याच्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचे 11 खेळाडू चमकले!