Crime news
Crime newsesakal

Nashik Crime: कांदा भरलेला ट्र्क घेऊन चालकाने केला पोबारा; अहमदाबादला पोचलाच नाही!

Published on

सटाणा : नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुलाई ट्रेडिंग कंपनीचा पाच लाखांचा कांदा भरलेला ट्रक घेऊन चालकाने पोबारा केल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित ट्रक चालकाविरोधात जायखेडा पोलिसांत ट्रक लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या वाहनाविषयी माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन सुलाई ट्रेडिंगचे संचालक मनोज पोपट येवला यांनी केले. (Driver commits robbery with truck full of onions at satana Nashik Crime)

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुलाई ट्रेडिंगच्या नावाने मनोज येवला हे कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून विविध राज्यात माल पोचवतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. १७) रात्री आठला नामपूर येथून अहमदाबाद येथील बाजार समितीत ट्रक (जीजे ०१ बीव्ही १३९५) मध्ये १७ टन कांदा भरून पाठवला होता.

हा ट्रक दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत पोचणे अपेक्षित होते. मात्र ट्रक सायंकाळपर्यंत पोचलाच नव्हता. ट्रकचालक दिनेश तडवी यास मोबाईलवर दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संबंधित ट्रकचालक फोन उचलत नव्हता.

Crime news
Crime News : एकतर्फी प्रेमातून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळीबार; दोन भावांचा मृत्यू, चौघे जखमी

संबंधित ट्रक मालेगाव येथील मंगलदीप ट्रान्स्पोर्ट येथून भाडेतत्त्वावर आणला होता. ट्रान्स्पोर्ट मालक मनोज महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

गाडीचा तपास लागत नसल्याने कांदा मालक मनोज येवला यांनी संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, जायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल भामरे, बरगळ गुन्ह्याच्या तपासासाठी रवाना झाले.

Crime news
Mumbai Crime: कुर्ल्यात पुलाखाली आढळली बेवारस सुटकेस; उघडताच..., कुर्ल्यातील घटनेनं खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com