नाशिक- नाशिक रोड हद्दीतील मालकाच्याच दहा लाखांच्या रोकडवर डल्ला मारणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चांदवडच्या मंगरूळ फाट्यावर सापळा रचून अटक केली. संशयितांकडून चोरीची दहा लाखांची रोकड व दुचाकी असा दहा लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संशयित चालक मालकाचा विश्वासू असताना त्याने केलेल्या चोरीला त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याने ते गेल्या काही आठवड्यांपासून फिरत असल्याचे तपासातून समोर आले आहे.