
पंचवटी (जि. नाशिक) : पेठ रोड आणि दिंडोरी रोडवर मोकाट जनावरांचा वावर नित्याचाच झालेला आहे. ही जनावरे केवळ रस्त्यात उभीच राहत नाही तर कधीही इकडे- तिकडे धाव घेतात. त्याचा अंदाज रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना येत नाही. ती वाहनांवर आदळण्याची शक्यता वाढते. अचानक धावून येणाऱ्या वाहनांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. रस्त्यावरील या मोकाट जनावरांची समस्येने पादचारीही त्रस्त झालेले आहे. या मोकाट जनावरांची वाहनचालकांसह पादचाऱ्यांनी धास्ती वाटत आहे. या जनावरांवर अंकुश घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Drivers pedestrians suffering due to loose animals Stop at Dindori Road Peth Nashik Latest Marathi News)
पंचवटीतील फुलेनगर हा झोपडपट्टीचा भाग पेठ रोड व दिंडोरी रोड यांच्यामध्ये येतो. याच परिसरात मोकाट जनावरांचा वावर जास्त आहे. मेरीच्या हायट्रो प्रकल्पाच्या समोरच्या भागातील रस्त्यावरील दुभाजकांवर या जनावरांची कायम ठिय्या असतो. ही जनावरे कधी कोणत्याही बाजूला उठून धावू लागतात.
त्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या हे लक्षातही येत नाही. अशावेळी अपघात घडण्याची शक्यता वाढते. चार वर्षापूर्वी याच भागात एक गाय अचानक रस्त्यावर धावत आल्याने एका चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आणि मेरीच्या भिंतीवर आदळली होती. या अपघातात वाहकासह प्रवासी जखमी झाले होते.
बसचा अपघात घडल्यानंतरही येथील मोकाट जनावरांची संख्या कमी झाली नाही. बाजार समितीच्या आवारातील फेकलेल्या भाज्या, भाज्यांची पाने, सडलेले अवशेष यांच्यावर गुजराण करणारी ही जनावरे दिंडोरी रोड तसेच पेठ रोडच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यातील खाद्य पदार्थांवर गुजराण करतात.
गाईबरोबरच येथे कुत्र्यांची आणि डुकरांचीही संख्या मोठी आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर खाऊन ते रस्त्यातील दुभाजकावरच ठाण मांडतात आणि कधीही उठून रस्त्यावर धाव घेतात. पेठ व दिंडोरी रोडवरील त्या जनावरांचा त्रास वाहनचालकांना व पादचाऱ्यांना होत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.