टुडे १ साठी..
--------
चााैकटीची बातमी...
-----
गोंधळाने महसूलमंत्रीही अवाक...
नियोजनाचा अभाव; दंगा नियंत्रण पथकाला पाचारण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (ता. ४) सकाळी अकराला नियोजन भवनात दुष्काळाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. नियोजन भवनाच्या वाहनतळ (पार्किंग) परिसरात निवेदन देणाऱ्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था होती. नागरिक खुर्चीवर बसले होते. बैठकीला आलेल्या मंत्री बावनकुळे यांना अगोदर आढावा बैठक आणि नंतर निवेदने स्वीकारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले गेले नाही. यामुळे मंत्री बावनकुळे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी पार्किंग परिसरात जावून बाकावर बसले. यामुळे निवेदने देणाऱ्यांनी एकच गोंधळ केला.
नागरिकांना मंत्र्यांपासून बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र तरीही ते एकेनात, मंत्री बावनकुळेंनी हातात माइक घेऊन सर्वांना शांतता राखा, मी सर्वांचे निवेदन स्वीकारेल, असे सांगितले. तरीही गोंधळ काही कमी होईना. यामुळे मंत्रीही अवाक् झाले.
शेवटी महिलांचे दंगा नियंत्रक बोलाविण्यात आले. महिलांनी निवेदन देणाऱ्या नागरिकांना रांगेत उभे केले. तेव्हा कोठे निवेदने स्वीकारली गेली. मात्र या गोंधळाची आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच चर्चा रंगली होती. कोणा अधिकाऱ्याकडे निवेदन देणाऱ्यांना आत सोडण्याची जबाबदारी होती. कोणी त्याकडे दुर्लक्ष केले, याबाबत महसूल कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.
-------
चौकट
टोकन दिल्यावरही नियोजन नाही
दुष्काळाबाबत व अन्य मागण्यांचे निवेदन नागरिकांकडून स्वीकारण्याचा कार्यक्रम नियोजित होता. यामुळे निवेदन देणाऱ्यांना टोकन नंबर देऊन त्याप्रमाणे निवेदन देण्यास सांगितले होते. निवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम आढावा बैठकीनंतर होता. मात्र तसे मंत्र्यांना सांगीतले गेले नाही. यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले.
---