धक्कादायक! दारणा नदीत पोहायला जाणाऱ्या युवकांचे थेट बाहेर पडताएत मृतदेह....सलग तीन घटना

darna river drowned.png
darna river drowned.png
Updated on

नाशिक : दारणा नदीपात्रात पोहणाऱ्या युवकांचे मृतदेह दोन दिवस सलग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे तिन्हीही घटना (ता.१४ व १५)  गुरूवार अन् शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी पोहायला गेलेल्या व्यक्तींसोबत घडल्याने सर्वत्र आश्चर्य अन् चिंतेचे वातावरण आहे

पहिली घटना.. बांबळेवाडीतील वैद्यकिय अधिकाऱ्यासोबत घडला प्रकार

टाकेद बु।। जवळील बाबळेवाडी येथील वैद्यकिय आधिकारी विनोद नामदेव मेमाने ( वय28 ) मित्रासमवेत मावशीकडे घोटी खु।। आले होते. ते काल सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दारणा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. नदीपात्रात मोठ्याप्रमाणात जलपर्णी आसल्याने ते जलपर्णी मध्ये अडकून बेपत्ता झाले. मित्रांनी आरडाओरड करून इतरांना माहिती सांगितली रात्रभर त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाही. आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान डॉक्‍टर मेमाने यांचा मृतदेह मिळून आला.या घटनेची खबर घोटी खुर्दचे पोलीस पाटील कैलास कोकणे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील, पो. हवा. वाजे बोराडे, गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्नालय नाशिक येथे पाठविण्यात आला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव पुढील तपास करीत आहे. 


तर दुसरी घटना ...एक मृतदेह तरंगत होता नदीपात्रात

चेहेडी गावाजवळील दारणा नदीवरील जुन्या पुलालगत नदीपात्रात अमोल संजय पाटील (वय २३, रा. प्रबुद्धनगर, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या युवकाचा दारणा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला, की त्याचा घातपात झाला याबाबत नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत. गुरुवारी(ता.१४)  दुपारी एक वाजेच्या सुमारास दारणा नदीपात्रातील पाण्यात एक मृतदेह तरंगत वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पळसे येथील पोलिसपाटील सुनील गायधनी, अजित गायधनी, संदीप गायधनी या नागरिकांनी दारणा नदीवर वाहत जाणारा मृतदेह पाण्याबाहेर काढला. नगरसेवक पंडित आवारे, पालिकेच्या नाशिकरोड अग्निशमन दलाचे पथक यांनीही घटनास्थळी भेट देवून मदतकार्य केले. मयत युवकांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आल्यावर हंबरडा फोडला. आनंद पाटील हा युवक गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत घरीच होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. आनंदचा इलेक्ट्रीकल डिप्लोमा झालेला होते. तो एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. परंतु, सध्या लॉकडाउनमुळे कंपनी बंद असल्याने तो घरीच होता. सुटी असल्याने तो दारणा नदीत पोहण्यासाठी गेला असण्याची शक्यता आहे.

तिसरी घटना
जोगलटेंभी गावाजवळ दारणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या कैलास अशोक जाधव (वय २०, रा. चाटोरी, ता. निफाड) या युवकाचादेखील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१४) दुपारी घडली. या दोन्हीही घटनांची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com