Lalit Patil Drug Case: ड्रग्स माफिया ललित पाटील नाशिक पोलिसांच्या ताब्यात

dhangekar warn strike protest in Lalit Patil drug case crime pune marathi news
dhangekar warn strike protest in Lalit Patil drug case crime pune marathi newsesakal

Lalit Patil Drug Case : शिंदेगाव एमडी (मफेड्रोन) ड्रग्स प्रकरणातील मुख्य संशयित व ड्रग्स माफिया ललित पाटील (पानपाटील) यास नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी शुक्रवारी (ता 8) अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या ताब्यातुन ललितचा ताबा घेतला आहे. त्यास मुंबई पोलिसांनी चेन्नईतुन अटक केली होती. ललित यास उद्या नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. (Drug mafia Lalit Patil in custody of Nashik police news)

गेल्या महिन्यात मुंबईच्या सकिनाका पोलिसांनी 6 ऑक्टोबर रोजी शिंदेगावात एमडी ड्रग्सचा कारखान्यावर छापा टाकून सुमारे 300 कोटींचे एमडी ड्रग्स व साहित्य असा साठा जप्त केला होता. त्यापाठोपाठ नाशिक पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी दुसरा कारखाना शोधून उद्ध्वस्त करीत ड्रग्सचा साठा जप्त केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करीत पुणे पोलिसांनी भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातून अटक केली तर ससून हॉस्पिटलमधून पसार झालेला ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी चेन्नईतुन अटक केली होती. त्याच्या तपासातून पोलिसांनी अनेकांना अटक करण्यात आली आहे.

dhangekar warn strike protest in Lalit Patil drug case crime pune marathi news
Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहातील कॉन्स्टेबलला अटक; ससूनचा कर्मचारीही ताब्यात

पुणे पोलिसांनीही ललित याचा ताबा घेत चौकशी केली. त्यातून ड्रग्स रॅकेटचा छडा पोलिसांनी लावला. नाशिक पोलिसानी गेल्या आठवड्यात भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांचा ताबा घेतला आहे. तर ललिताच्या ताबा पुणे पोलिसांनी मुंबईकडे दिला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी ललीतचा ताबा मुंबई पोलिसांकडे मागितला असता, आज नाशिक पोलिसांनी ललितचा ताबा घेतला आहे.

उकल होणार

ललित पाटील पुण्यातून पसार झाल्यानंतर दोन दिवस तो पुण्यात आला होता. येथून तो पसार झाला होता. त्याच्याच सांगण्यावरून भूषण याने शिंदेगावात दोन कारखाने सुरू केले होते. येथे बनविण्यात येणाऱ्या ड्रग्सची विक्री, कच्चा माल यासह त्यांचा रॅकेट या साऱ्याची ललित, भूषणच्या चौकशीतून या बाबींची उकल होणार आहे.

dhangekar warn strike protest in Lalit Patil drug case crime pune marathi news
Lalit Patil Drug Case: ड्रग्स माफिया ललित पाटीलचा नाशिक पोलिस ताबा घेणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com