Nashik Crime News : नाशिककरांभोवती थाटला जातोय नशेचा बाजार; प्रवेशद्वारातूनच मादक द्रव्यांची एन्ट्री

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक शहराचे मुख्य प्रवेशद्वारातूनच मादक द्रव्यांची ‘एन्ट्री’ सहजरीत्या होत आहे. वीकेंडला इगतपुरी-त्र्यंबक परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये रंगणाऱ्या संगीत पार्ट्यांमध्ये मादक द्रव्यांचा सर्रासपणे वापर होतो. ग्रामीण पोलिसांकडून कारवाई भासविले जाते; परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांची खुल्या हाताने एन्ट्री होत आहे. शहर पोलिसांकडूनही सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाशिककरांभोवती नशेचा बाजार थाटतो आहे, जो येत्या काळात शहराच्या आरोग्यासाठी रोग ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात यापूर्वीही गांजा, अफू, कोकेन आणि एमडी या प्रकारचे मादक द्रव्यांसंदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. परंतु त्या कारवाईनंतरही अमलीपदार्थांची तस्करी थांबली, असे मात्र ठामपणे म्हणता येणार नाही. असे असले तरी गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ लागल्याचेही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अमलीपदार्थांची शहर आणि ग्रामीण भागात आजही तस्करीने दाखल होतो. नशा करणाऱ्यांना हवे ते अमलीपदार्थ उपलब्ध होत आहेत, हे ‘सकाळ’च्या विशेष पाहणीतून समोर आले आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...


नाशिक शहराचे मुख्य प्रवेशद्वार हे मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी-त्र्यंबक तालुका आहे. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमलीपदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या साखळीतून (चैन) नाशिकपर्यंतही गांजा, अफू, कोकेन अन्‌ एमडी ड्रग्ज पोचत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वीकेंडच्या पार्ट्या केंद्रस्थानी
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात मोठमोठे रिसॉर्ट, हॉटेल्स आणि फार्महाउस उभे राहिले आहेत. या ठिकाणी शनिवार-रविवारी विकेंडला रंगीन पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांसाठी प्रामुख्याने मुंबईतील उच्चभ्रू तरुणाईला आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांकडून सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जातो.

सोशल मीडियाच्याच माध्यमातून या पार्ट्यांसाठी सशुल्क एन्ट्री घेतली जाते. पार्ट्यांमध्ये मद्यांपासून खाण्या-पिण्याची रेलचेल असते. अशाठिकाणी अत्यंत सावधगिरीने अन्‌ चोरी-छुप्यारीतीने गांजा, अफू, कोकेन अन्‌ एमडी ड्रग्ज‌ या अमलीपदार्थांची विक्री होत असते. त्यासाठी विशिष्ट सांकेतिक भाषा वापरली जाते. आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने या पार्ट्यांकडे सर्वसामान्यांचे लक्ष नाही.

Nashik Crime News
Nashik News : लोखंडाच्या तुकड्यांसाठी ‘ते’ घालताहेत जीव धोक्यात!

पार्ट्यांना शुल्क आकारणी
नाशिक शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या गिरणारे, जलालपूर, गोवर्धन, चांदसी या ग्रामीण पोलिस हद्दीतील परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, फार्महाउस आहेत. याशिवाय नाशिक शहरातील त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, पुना रोड, महामार्गालगतच्या अनेक तारांकित हॉटेल्समध्ये सशुल्क वीकेंड पार्ट्या होतात. त्यासाठी प्रतिव्यक्ती एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जातात. मात्र त्यासाठी कपल्स असणे बंधनकारक असून, महिलेला एन्ट्री मोफत असते. त्यातही वेळेचे बंधन असते. साडेआठपर्यंतच्या पार्टीसाठी वेगळे शुल्क, तर साडेआठनंतर पार्टी संपेपर्यंतचे शुल्क वेगळे असते. वीकेंडला या हॉटेल्सबाहेर पार्क करण्यात आलेल्या आलिशान कारवरून रंगीन पार्टीचा अंदाज येतो.

Nashik Crime News
Nashik Crime News : महिलेस मारहाण करून 52 हजारांचा ऐवज लांबवला; भोकणी येथील घटना

पोलिसांचा ‘खुला’ हात
नाशिक ग्रामीण वा नाशिक शहर पोलिसांना अमलीपदार्थांच्या तस्करीची इत्थंभूत माहिती आहे. गांजा, अफू या अमलीपदार्थांची मागणी सर्वसामान्य नशाखोरांकडून होत असते. पूर्वी पंचवटी आणि भद्रकालीत मोठ्या प्रमाणात साठा असायचा. काही वर्षांत वडाळागाव, पाथर्डी फाटा, आडगाव शिवार या ठिकाणीहून नशेचे रॅकेट चालविले जाते. परंतु अलीकडे अत्यंत सावधगिरीने साठा करून त्याची विक्री केली जाते. तर कोकेन आणि एमडी ड्रग्जची चैन ही मुंबईतून ऑपरेट केली जाते. या अमलीपदार्थांची मागणी उच्चभ्रू घरातील तरुणाईकडून असते. त्यासाठी मोठ्या रकमा अदा कराव्या लागतात.
(क्रमशः)

Nashik Crime News
Nashik Crime News : नाशिक शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितही अल्पवयीन

थंडीत हुक्का पार्लर पार्ट्या जोमात
राज्यात सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवणास प्रतिबंध आहे. मात्र शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये सुगंधितच्या नावाखाली प्रतिबंध असलेल्या नशेली तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का पार्ट्या होत आहेत. शहरालगतचा ग्रामीण परिसर, गंगापूर, त्र्यंबक रोड, नाशिक रोड, महामार्गालगतच्या हॉटेल्समध्ये हुक्का पार्ट्या थंडीत जोमात वाढल्या आहेत. हुक्क्यासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित अमलीपदार्थांच्या पुड्या विक्रीचा अड्डा आजही भद्रकालीत जोमात आहे. ज्याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com