Nashik Crime News : मालेगाव येथे छाप्यात गुंगीचे औषध, गोळ्या जप्त!

drug pills and medicine bottles seized by Special Police Team.
drug pills and medicine bottles seized by Special Police Team.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या मागदर्शनाखालील विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी छापे मारुन गुंगी आणणारे औषध व गुंगीच्या गोळ्या जप्त केल्या. (Drug pills seized in raid in Malegaon Nashik Crime News)

पोलिस पथकाने नविन बस स्थानकातील पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकला. मुमताज अहमद मोहम्मद जाबीर उर्फ इम्तीयाज, मोहम्मद हुसैन अब्दुल जब्बार उर्फ अब्दुल्ला हे दोघे गुंगी आणणारे औषध विकत होते. पोलिसांनी त्यांच्या जवळून गोळ्यांची ४० पाकिटे, मोबाईल फोन, रोख रक्कम, मोटार सायकल आदी २६ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला.

दोघांविरुद्ध आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पथकाने येथील जुना बसस्थानक परिसरात शफीउज्जेमा जैनुल आबदीन (वय ६०, रा. मकईपुल, बॉटीस्टार, रांधेर सुरत) याला गुंगी आणणारे औषध विक्री करताना पकडले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

drug pills and medicine bottles seized by Special Police Team.
Gram Panchayat Election: उपसरपंचपदासाठी फिल्डींग सुरू; काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये रस्सीखेच

त्याच्याजवळून ६०० गोळ्या, ७ बाटल्या, तसेच कुत्ता गोळी असा एकूण ३ हजार १५ रुपयाचा ऐवज जप्त केला. शफीउज्जेमा जैनुल आबदीन हा सुरत येथुन सदर गोळ्या व औषधे आणुन येथील साजीद किन्नर व कलीम गिट्टक यांना देण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कलीम गिट्टकला ताब्यात घेतले आहे.

अन्न व औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शैलेश पाटील, नाईक इम्रान सैय्यद, हवालदार दिनेश शेरावते, आयशानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

drug pills and medicine bottles seized by Special Police Team.
Panchayat Samiti Election : आरक्षणाच्या गुंतागुंतीने इच्छुकांमध्ये द्विधावस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com