Nashik Airport : नाशिक विमानतळाच्या नामकरणावरून दुहेरी मतप्रवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik ozar airport

Nashik Airport : नाशिक विमानतळाच्या नामकरणावरून दुहेरी मतप्रवाह

नाशिक रोड : ओझर विमानतळाच्या नामकरणावरून सध्या दुहेरी मतप्रवाह पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून नाशिकचे स्थानिक भूमिपुत्र कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नाव या विमानतळाला द्यावे, अशी मागणी करणारे डझनभर निवेदने शासन दरबारी देण्यात आली आहे. आता नाशिक विमानतळाला ‘जटायू’ हे नाव देण्यात यावे, अशी मागणी झाली आहे. महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी ही मागणी केली आहे.

हेही वाचा: Nashik Politics : माजी नगरसेवकांच्या हातात BJP नारळ देणार...?

नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाच्या नामकरणावरून दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहे. खासदार दादासाहेब गायकवाड नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील आंबे या गावचे होते. त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये मोठे काम उभे केले होते. ओझरला विमानांचा कारखाना येण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत प्रयत्नही केले होते. त्यामुळे त्यांचे नाव या विमानतळाला द्यावे, अशी मागणी करणारे निवेदने सरकार दप्तरी दाखल आहेत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

नाशिक नगरी ही प्रभू श्रीरामचंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नागरी आहे आणि रामायणात जटायू यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू’ हे नाव देण्यात यावे, अशी मागणी नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री यांनी केली आहे. नाशिक जशी धार्मिक नगरी आहे तशीच आंबेडकरी चळवळीची पुरोगामी नगरी समजली जाते. म्हणून विमानतळाच्या नामकरणावरून दुहेरी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन दरबारी काय न्याय निवड होतो, याचीच वाट आता नाशिक जिल्ह्यातले लोक पाहत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : बनावट विमान तिकिटे देवून प्रवाशांची फसवणूक

''खासदार दादासाहेब गायकवाड यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक चळवळी उभे केलेले आहेत. आमचा कोणालाही विरोध नाही. मात्र एचएएल कारखाना आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या कारखान्यापासून त्यांचे आंबेगाव जवळच असून भारताच्या सामाजिक चळवळीत दादासाहेब गायकवाड यांचे काम मोठे आहे. त्यांचे नाव ओझर विमानतळाला दिल्यास दादासाहेब गायकवाड यांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल.'' - भारत निकम. सामाजिक कार्यकर्ते. गुलाबी सदरा.

''जटायू रामायणातील गरुडपात्र आहे. नाशिक विमानतळाला जटायू एअरपोर्ट या नावाने संबोधले जावे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी ही कुंभनगरी आहे आणि जटायू यांचे रामायणात अमूल्य असे योगदान आहे. त्यामुळे हे एअरपोर्ट जटायू या नावाने संबोधले जावे, असे सर्व संत समाजाकडून हिंदुत्ववादी संघटनांच्या विनंती करू इच्छितो.'' - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे

हेही वाचा: Nashik News : नाशिक शहरात कचरा वाढला की वाढवला? 250 टन कचरा वाढल्याने उठताय संशयाचे मोहोळ

टॅग्स :NashikAirport