election
sakal
जुने नाशिक: ‘दुबई वॉर्ड’ या नावाने शहरभर प्रसिद्ध असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागात झालेल्या मोठ्या पक्षबदलांच्या मालिकेमुळे महाविकास आघाडीसमोर उमेदवार शोधण्याचे आव्हान बनले आहे. त्यातच या प्रभागातून इच्छुकांची निवडणूक लढविण्याची भाऊगर्दी अधिक दिसून येत आहे.