Nashik : 2 शासकीय यंत्रणांमुळे शेतकरी, प्रवाशांचे हाल

In Pimpalwane area, the Punegaon canal overflows and the water goes to the fields
In Pimpalwane area, the Punegaon canal overflows and the water goes to the fieldsesakal

वडनेरभैरव (जि. नाशिक) : चांदवड व दिंडोरी या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रत्नगड या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामामुळे थोडा अधिक पाऊस पडला तरी दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या चार वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच चांदवड तालुक्यासाठी वरदान ठरेल असे वाटणाऱ्या पुणे गाव कालव्याच्या निकृष्ट कामामुळे पिंपळनारे, वडनेरभैरव परिसरात कालव्यातून व कालव्याच्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दर वर्षी होत आहे. शेतकऱ्यांनी मागणी करूनही अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. (Due to 2 government systems farmers commuters are suffering Nashik Latest Marathi News)

चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिंडोरी व चांदवड या दोन तालुक्यांना जोडणारा रत्नाकर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, या रस्त्यावर काम झाल्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते, हा प्रश्न चार वर्षांपासून अनेकदा उपस्थित झाला होता.

या वर्षी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आमदार निधीतून पाणी ओझरखेड कालव्यात काढून देण्यासाठी सोय केली आहे. मात्र तीदेखील अपुरी पडत असल्याने रस्त्यावर पाणी साचतच आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी व रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. बांधकाम विभागाने रस्ता बनविताना रस्त्याच्या दुतर्फा गटारी असणे आवश्यक असताना आजपर्यंत गटारी का खोदण्यात आल्या नाही, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

मांजरपाड्यातून पुणे गाव धरणमार्गे चांदवड तालुक्याला मृगजळ ठरेल या अपेक्षेने तयार करण्यात आलेला कालवा मात्र वडनेरभैरव-पिंपळनारे या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

दर वर्षी पावसाळ्यात कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी परिसरात कालव्याच्या वरून व लिकेज कालव्यातून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात असते. त्यामुळे वर्षानुवर्ष या शेतकऱ्यांचे टोमॅटो, द्राक्षबाग, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. विषयी पदाधिकाऱ्यांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

In Pimpalwane area, the Punegaon canal overflows and the water goes to the fields
Crime Update : पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

"गेली चार वर्ष आम्ही सतत सामाजिक बांधकाम विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना वेळोवेळी वडनेरभैरव-खेडगाव (एमडीआर ६९) रस्त्यात दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता पूर्णपणे बंद होतो. आज काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सा.बां. विभाग कडक कारवाई करून का रस्त्याच्या दुतर्फा चारी खोदत नाही."

- प्रमोद निकम, ग्रामस्थ, वडनेरभैरव

"पिंपळनारे येथे पुणेगाव कालव्याच्या पाण्याच्या गळतीमुळे दर वर्षी शेतकऱ्यांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. द्राक्षे आणि टोमॅटो ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. याच पिकांसाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पाण्याच्या गळतीमुळे हातात पीक नसल्याने शेतकऱ्यांना एक पैसाही मिळत नाही. तालुक्यातील संबंधित नेत्यांनी प्रकरणामध्ये लक्ष घालावे. शेतकऱ्यांनी दर वर्षी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र या समस्येवर योग्य तोडगा निघालेला नाही." -डॉ. मनीषा पाटील

In Pimpalwane area, the Punegaon canal overflows and the water goes to the fields
Nashik : वडनेरभैरव ग्रामपालिकेतर्फे मुलींना अनोखी भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com