Crime Update : पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

murder
murderesakal

जुने नाशिक : वडाळागाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना सोमवार (ता.१५) सकाळी उघडकीस आली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पतीस पोलिसांकडून अटक करण्यात आली. रिजवान इसाक पठाण (वय. ३४, रा.मदिना लॉन्स मागे, तब्बसूम बिल्डिंग, वडाळागाव)असे संशयीत पतीचे नाव आहे. (Husband kills wife by choking her neck nashik Crime Update Latest Marathi News)

संशयीत रिजवान पठाण पत्नी हुमेरा रिजवान पठाण (वय.२७) मुलांसह तब्बसूम बिल्डिंग, वडाळागाव रहावयास होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत. संशयित रिजवान नशेत पत्नीशी वारंवार वाद घालून मारहाण करत असत.

रविवार (ता.१४) मध्यरात्री सुमारे दोन वाजे ते पाच वाजेच्या दरम्यान संशयित मित्रांसह नशा करून घरी आला. पत्नीवर संशय घेत वाद घालून मारहाण केली. दरम्यान मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली.

murder
MVP Election : येवल्यासाठी प्रगती पॅनेलकडून माणिकराव शिंदेंचे नाव जाहीर

पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. सकाळी आई झोपेतून उठत नसल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी आजीकडे जाऊन आई झोपेतून उठत नसल्याचे सांगितले. आजीने मुलांसह त्यांच्या घरात जाऊन पाहणी केली. हूमेरा मृत अवस्थेत आढळून आली. तिने ठाओ फोडताच शेजाऱ्यांसह अन्य नातेवाईक धावत आले.

त्यांच्याकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहे. तत्पूर्वी रविवारी दुपारी संशयताने मुलांनाही मारहाण केली होती.

तसेच मृत हुमेराला घरातून निघून जा नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली होती. शेवटी सकाळी तिचा खून झाल्याचे वृत्त मिळाल्याची माहिती तिच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. शिवाय त्याच्याबरोबर आलेले अन्य चौघांचाही पोलिसांनी शोध घेत तपास करावा. अशी मागणी यावेळेस करण्यात आली.

murder
अतिवृष्टीमुळे नुकसान, पिकांचे तत्काळ पंचनामे करा : मंत्री भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com