esakal | शॉर्टसर्किटमुळे कांदा चाळीला आग; लाखो रुपयांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

onion

शॉर्टसर्किटमुळे कांदा चाळीला आग; लाखो रुपयांचे नुकसान

sakal_logo
By
रवींद्र मोरे

बिजोरसे (जि. नाशिक) : येथील शेतकरी रामराव शिवराम मोरे यांच्या कांदा चाळीला सोमवारी (ता. ६) शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. मोरे यांनी पाचटापासून कांद्याची चाळ बनवलेली होती. जवळच लोंबकळलेल्या विज तारा एकमेकाला चिकटून वीज प्रवाह तयार होऊन कांदा चाळीने अचानक पेट घेतला. या घटनेत सुमारे पाच ते सहा ट्रॉली कांदा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

लोंबकळलेल्या तारांबाबत महावितरण कंपनीला वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सदर दुर्घटना घडल्याचे शेतकऱ्याने सांगितले. कष्टातून पिकवलेल्या कांद्याचे काही क्षणात नुकसान झाल्याने रामराव मोरे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

महावितरण कंपनीचे जयप्रकाश पाटील, तलाठी विनोद सोनवणे यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी रामराव मोरे, सरपंच राजेंद्र मोरे, शेखर मोरे, पोलिस पाटील अविनाश मोरे, प्रा. रवींद्र मोरे, धनंजय मोरे आदींनी केली आहे.

हेही वाचा: नाशिक : 'सीएनजी'साठी भल्‍या पहाटेपासून रांगा

loading image
go to top