esakal | नाशिककरांची 'सीएनजी'साठी कसरत; पंपाबाहेर भल्‍या पहाटेपासून रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik CNG

नाशिक : 'सीएनजी'साठी भल्‍या पहाटेपासून रांगा

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : पेट्रोल, डिझेलच्‍या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, सर्वसामान्‍यांचे आर्थिक गणित कोलमडते आहे. अशात अनेक वाहनचालकांकडून सीएनजीला प्राधान्‍य दिले जाते आहे. परंतु गॅस मिळविण्यासाठी सध्या शहरात मोठी कसरत करावी लागते आहे. सीएनजीसाठी पहाटेपासून रांगा लागत असून, अवघ्या चार तासांत पंपांवरील साठा संपत असल्‍याची स्‍थिती आहे.


रिक्षा, चारचाकी वाहनांपासून तर प्रवाशी वाहतूक करणार्या बसगाड्यादेखील आता सीएनजीवर धावू लागल्‍या आहेत. गेल्‍या काही दिवसांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर सातत्‍याने वाढत असतांना, पर्यायी व्‍यवस्‍था म्‍हणून गॅसवर वाहने चालविली जाऊ लागली आहेत. अनेक वाहनचालकांकडून सीएनजीसाठी विशेष असे किट बसविले जाते आहे. एकीकडे सीएनजीवर चालणार्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असतांना, गॅसचा पुरवठा मात्र तुलनेत कमीच असल्‍याची सध्याची परीस्‍थिती आहे. सीएनजी पुरवठा करणाऱ्या पंपांची संख्या वाढत असली तरी अद्यापही मागणीच्‍या तुलनेत पुरवठ्याचे सूत्र सुटसुटीत होऊ शकलेले नाही.

हेही वाचा: नाशिक : सराफ व्यावसायिकास मारहाण; दागिन्याची बँग पळवली


लांबच लांब रांगा

त्र्यंबकनाका परीसरातील भारत पेट्रोलियमच्‍या पंपावर पहाटेपासून लांबच लांब रांगा सध्या बघायला मिळत आहेत. यात रिक्षा, कारचा समावेश आहे. सकाळी सातला सीएनजी वितरणाचे काम सुरु होते. अवघ्या चार तासांत संपूर्ण गॅसचा साठा संपत असल्‍याचे व्‍यवस्‍थापकांचे म्‍हणणे आहे. अशात साठा संपल्यानंतर रांगेत तासंतास उभ्या वाहनांना रिकाम्‍या हाती परतावे लागत असल्‍याचेही बघायला मिळते आहे. शहरातील अन्‍य सीएनजी पंपांवरही अशीच परीस्‍थिती असल्‍याचे सांगितले जाते आहे. सध्या साठा सुरळीत होत असला तरी मागणीत मोठी वाढ झाल्‍याने मुबलक प्रमाणात गॅस उपलब्‍ध होत नसल्‍याचे सांगितले जाते आहे.

हेही वाचा: नाशिक : 'कोयता गॅंग'ची दिवसाढवळ्या दहशत! नागरिक भयभीत

loading image
go to top