esakal | पालखेड, वाघाड, पुणेगाव धरणे 100 टक्के भरली! शेतकऱ्यांमध्ये समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Punegaon Dam

पालखेड, वाघाड, पुणेगाव धरणे 100 टक्के भरली!

sakal_logo
By
संदीप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात २४ तासात २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पालखेड धरण शंभर टक्के भरल्याने ८७४ क्यूसेकने कादवा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे.


अनेक दिवसांपासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती, मात्र दोन दिवसापासून तालुक्यात संततधारेने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. दिंडोरीच्या पूर्व भागात तीसगाव, मातेरेवाडी, मोहाडी, खडक सुकेणे, जानोरी, खेडगाव, पालखेड, कादवा कारखाना, बोपेगाव, तिसगाव आदी ठिकाणी पाऊस कमी असला तरी पश्‍चिम भागात पुणेगाव, देवसाने, ननाशी, झारली, आंबेगण, वाघाड, पिपरखेड आदी ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. करंजवण धरण ८० टक्के, ओझरखेड ७१%, तिसगाव ७४ % पाणीसाठा उपलब्ध आहे. दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेती व पाणीयोजना या पालखेड व वाघाड धरणावर अवलंबून आहे. दोन्ही धरणे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे, त्यामुळे नदी व नाल्यांद्वारे धरणात आवक वाढली आहे. पालखेड धरणातून १७४८ क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,
- सुदर्शन सानप, शाखाधिकारी पालखेड धरण

हेही वाचा: IPL बेटिंग सुरू ठेवण्यासाठी मागीतली लाच; पीएसआयसह एकाला अटक

हेही वाचा: 'भुजबळ भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे, प्राचार्य' : सुहास कांदे

loading image
go to top