esakal | Nashik Crime | IPL बेटिंग सुरु ठेवण्यासाठी मागीतली लाच; पीएसआयसह एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

man arrested along with police sub-inspector for soliciting bribe to continue ipl betting

IPL बेटिंग सुरू ठेवण्यासाठी मागीतली लाच; पीएसआयसह एकाला अटक

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : आयपीएल (IPL) बेटिंगबाबत कारवाई न करता, ती तशीच सुरू ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिस विभागातील उपनिरीक्षकाला तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत पकडले. त्याच्या सोबत एका खासगी व्यक्तीला पकडण्यात आले आहे. संशयित उपनिरीक्षक ग्रामीण पोलिस दलात गुन्हे शाखेत नेमणुकीला आहे.


महेश वामनराव शिंदे (वय ३८) असे संशयित उपनिरीक्षक, तर संजय आझाद खराडे (४५) असे त्यांच्या सोबत पकडलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. या दोघांनी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत, तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. देवळाली कॅम्प येथील तक्रारदाराच्या सदनिकेवर आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेटिंग सुरू असल्याने त्याबाबत तक्रारी येत असल्याचे तक्रारदारास सांगून तक्रारदाराविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आयपीएल मॅच बेटिंगचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी संशयित उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. २५) चार लाखांची लाच खासगी व्यक्तीने मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी संशयितासह त्याच्यासोबत खासगी व्यक्तीला तीन लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

हेही वाचा: 'भुजबळ भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे, प्राचार्य' : सुहास कांदे

पोलिस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, अभिषेक पाटील, निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शिरीष अमृतकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: संगमनेर : जन्मदात्या बापाकडून 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

loading image
go to top