गिरणा धरण ७० टक्के भरले! पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

गिरणा धरण
गिरणा धरणSakal

मालेगाव (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणात जलसाठा झपाट्याने वाढत आहे. आठवड्यापासून कसमादेतील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर आदी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गिरणा व मोसम या दोन्ही नद्या वाहत आहेत. पूरपाण्यामुळे गिरणाचा जलसाठा १२ हजार ८७१ दशलक्ष घनफुटावर पोचला आहे. धरण ७० टक्के भरले असून, पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सलग दोन वर्षे गिरणा ओव्हरफ्लो झाले. परतीचा जोरदार पाऊस झाल्यास या वर्षीही धरण भरण्याची शक्यता असून, गिरणा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.


कसमादेत या वर्षी चांगल्या सुरवातीनंतर जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवली. ऑगस्टमध्ये झालेला पाऊस खरिपासाठी जीवदान ठरला. त्याचबरोबर विविध धरणांमधील जलसाठा वाढण्यास मदत झाली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कसमादेतील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली. चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर धरणे भरल्यानंतर गिरणा व मोसम दोन्ही नद्यांना पूरपाणी आले. याचा फायदा गिरणा धरणातील साठा वाढण्यात झाला. पंधरा दिवसांपासून धरणात रोज दीडशे ते दोनशे दशलक्ष घनफूट जलसाठा वाढत आहे.

परतीचा जोरदार पाऊस झाल्यास गिरणा व मोसम या नद्यांना मोठा पूर येऊ शकेल. परिणामी, सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो होऊ शकेल. धरणातील वाढता जलसाठा पर्यटकांना खुणावत आहे. मालेगावसह कसमादेतील पर्यटक गिरणा धरणावर नेहमी फेरफटका मारतात. मासे खाणारे खवय्येदेखील धरणातील वाढत्या जलसाठ्याने खूश आहेत.

गिरणा धरण
राज ठाकरेंचा शाखा प्रमुखांना इशारा; म्हणाले, बोलावलं त्यांनीच…


कसमादेतील धरणे व जलसाठा (दशलक्ष घनफुटात)

धरणे - क्षमता - सध्याचा जलसाठा - टक्केवारी
चणकापूर - २४२७ - २३५४ - ९७
हरणबारी - ११६६ - ११६६ - १००
केळझर - ५७२ - ५७२- १००
नाग्या-साक्या - ३९७ -३९७ - १००
गिरणा - १८५०० - १२८७१ - ७०
पुनंद - १३०७ - १२७७ - ९८
माणिकपुंज - ३३५ - ३३५- १००

गिरणा धरण
नाशिक मनसेच्या नवनियुक्त शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com