esakal | दराअभावी मिरची ‘तिखट’! शेतकऱ्याने उपटून टाकले दीड एकर पिक
sakal

बोलून बातमी शोधा

Rghunath Jagtap

दराअभावी मिरची ‘तिखट’! शेतकऱ्याने उपटून टाकले दीड एकर पिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अंदरसूल (जि. नाशिक) : येवल्यात दुसऱ्यांदा लाल चिखल झाल्यानंतर आता मिरचीचा ठसका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. अंदरसूल येथील शेतकरी रघुनाथ जगताप यांनी केलेल्या मिरचीला कवडीमोल मिळत असल्याने संतप्त शेतकरी रघुनाथ जगताप यांनी आपल्या दीड एकर मिरचीचे उभे पीक अक्षरश: उपटून टाकले.


शेतकरी जगताप यांनी एक लाख ८० हजार रुपये खर्च करून दीड एकरमध्ये मिरचीचे पीक घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस या मिरचीला कवडीमोल भाव मिळत गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मिरचीचे पिक उपटून बांधावर फेकून दिले. तर, काही मिरचीची झाडेही उकिरड्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. दिवसेंदिवस शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने बळीराजाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

loading image
go to top