Rate Hike : टीव्‍ही पाहाण्यासाठी 30 टक्‍के जादा पैसे; चॅनल बंद पडण्याची शक्‍यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV

Rate Hike : टीव्‍ही पाहाण्यासाठी 30 टक्‍के जादा पैसे; चॅनल बंद पडण्याची शक्‍यता

नाशिक : ब्रॉडकास्‍टर्स अर्थात विविध वाहिन्‍या चालविणाऱ्या कंपन्‍यांनी दरवाढ केली असल्‍याने, याची झळ ग्राहकांना बसण्याची शक्‍यता आहे.

या दरवाढीमुळे टीव्‍ही (TV) पाहाण्यासाठी तब्‍बल ३० टक्‍यांपर्यंत जादा पैसे मोजावे लागणार आहे. (Due to price hike by Broadcasters customers have to pay up to 30 percent more to watch TV nashik news)

दरवाढीला केबलचालकांकडून विरोध केला जात असून, न्‍यायालयात धाव घेण्यात आली आहे. या संघर्षामुळे मात्र ग्राहकांचे चॅनल बंद पडण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

ग्राहकांवर आर्थिक बोझा येणार असल्‍याने ब्रॉडकास्‍टर्सकडून केलेल्‍या दरवाढीचा केबलचालकांनी विरोध केला आहे. त्‍यामुळे पुरवठादार कंपन्‍यांकडून चॅनल बंद केले जाण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात केबलचालकांकडून ग्राहकांना संदेश पाठविताना जागृकता निर्माण केली जाते आहे. ट्रायच्‍या

नवीन टॅरिफ ऑर्डरनुसार चॅनेल्स आणि पॅकेजच्या किमतीमध्ये ब्रॉडकास्टरकडून भरपूर प्रमाणात वाढ केली आहे. याचा विरोध करत असून, वेगवेगळ्या कंपन्‍या पोर्टलवर आपली चॅनेलची सेवा बंद केली आहे. आपल्या देशातील सर्व आघाडीच्या 'एमएसओ'ने ब्रॉडकास्टरने वाढवलेल्या किमतीचा विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सर्व ग्राहकांना वास्तविक किमतींमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी अस्तित्वाच्या लढाईत सहकार्य करण्यासाठी ग्राहकांना साकडे घातले जाते आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.२०) न्‍यायालयात सुनावणी असून, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

दरवाढ अशी- (केबल व्‍यावसायिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार)

ब्रॉडकास्टर पूर्वीचे दर प्रस्‍तावित वाढीव दर (रुपयांत)

स्‍टार ४९.०० ६२

सोनी ३०.५० ४६

झी ३९ ४९

कलर्स २५ ३०

डिस्‍कव्‍हरी ८ १३

"ग्राहकांच्‍या सोयीसाठी २०१८ मध्ये केलेल्‍या बदलानंतर बचत कमी, उलट दरवाढ झालेली आहे. ब्रॉडकास्‍टर्सच्‍या सध्याच्‍या धोरणामुळे ग्राहकांच्‍या खिशाला झळ बसणार असून, त्‍यास आमच्‍या व्‍यावसायिकांचा विरोध आहे. या लढाईत ग्राहकांनीदेखील सहकार्य करावे." -अजय नेमाडे, केबल पुरवठादार.

टॅग्स :Nashiktv