esakal | नोकरभरतीच्या विलंबामुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी; वय वाढल्याने भीती
sakal

बोलून बातमी शोधा

recruitment

नोकरभरतीच्या विलंबामुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी; वय वाढल्याने भीती

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनामुळे (coronavirus) अवघ्या जगातील व्यवहार ठप्प झाले असून, या महामारीचा परिणाम नोकरभरतीवर (recruitment) झाला आहे. गेल्या दीड वर्षापासून भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना वयाच्या अटीमुळे आता शासनाच्या नोकरभरतीपासून वंचित राहावे लागणार आहे. (youth afraid Due to recruitment delays)

कोरोनाचा फटका; वय वाढल्याने वंचित राहण्याची भीती

आज ना उद्या कोरोनाचा प्रादुर्भाव होईल. देश कोरोनाच्या संकटातून बाहेर येईल, या आशेवर पिंपळगाव बसवंत परिसरातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षा, सैन्य व पोलिसभरतीत वर्णी लागण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने राज्य शासनाने पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढविल्याने विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांचे अधिकारी, कर्मचारी होण्याचे स्वप्न भंगले आहे. सध्याची कोरोनाची देशभरातील परिस्थिती बघता सरकार आणखी लॉकडाउन वाढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विविध परीक्षांची लागणारी वयाची अट अनेकांनी पार केल्याने त्यांच्याकडे सध्या खासगी नोकरीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने दखल घेऊन वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.त्यामुळे पोलिसभरतीसाठी तंदुरुस्त शरीरयष्टी बनविण्यासाठी मैदानावर घाम गाळणाऱ्या तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती आहे. तशी प्रतिक्रिया काही तरुणांनी बोलून दाखविली.

हेही वाचा: Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!

आमची वयोमर्यादा संपत चालली असून, भरतीप्रक्रिया लवकरच घ्यावी. तसे न केल्यास आम्हा बेरोजगारांचे स्वप्न भंग होईल. -राहुल पवार, राहुल साळुंखे

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?

मी पोलिसभरतीसाठी खूप मेहनत करीत आहे. दररोज दोन ते तीन तास अंगमेहनत, व्यायाम, पूरक आहार घेत आहे. मात्र कोरोनामुळे भरती थांबल्याने वयाच्या निकषात न बसण्याची भीती आहे.-समीर वाघ, पिंपळगाव बसवंत